शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अशोकाच्या चांदशी शाळेत नाशिककरांना घडणार ‘इस्त्रो’च्या प्रवासाची सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 20:02 IST

‘विक्रम साराभाई स्पेस एक्झिबिशन’चे. येत्या शुक्रवारपासून (दि.४) अशोकाच्या चांदशी गावाजवळील अर्जुननगर येथील शाळेत हे विशेष प्रदर्शन भरविले जात आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असून यासाठी सर्वांना प्रवेश खुला.

ठळक मुद्देअवकाशाविषयीचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागेल,इस्त्रोच्या २० उपकरणांचा समावेश

नाशिक : अंतराळाविषयी नेहमीच जनसामान्यांमध्ये कुतुहल पहावयास मिळते. अंतराळ मोहिमांविषयीदेखील विविध प्रश्नांचे काहुर लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच मनात उठलेले असते. कुतुहल अन् विविध प्रश्नांचे उत्तर थेट भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून(इस्त्रो) नाशिककरांना मिळणार आहे.निमित्त आहे, जागतिक अंतराळ सप्ताहनिमित्त शहरात प्रथमच अशोका एज्युकेशन फाऊण्डेशन आणि इस्त्रोच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘विक्रम साराभाई स्पेस एक्झिबिशन’चे. येत्या शुक्रवारपासून (दि.४) अशोकाच्या चांदशी गावाजवळील अर्जुननगर येथील शाळेत हे विशेष प्रदर्शन भरविले जात आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असून यासाठी सर्वांना प्रवेश खुला असल्याची माहिती फाउण्डेशनचे सहसचिव श्रीकांत शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेच्या विश्वस्त आस्था कटारिया उपस्थित होत्या. यावेळी शुक्ला म्हणाले, इस्त्रोच्या वैज्ञानिकांमुळे मेट्रो शहरांप्रमाणेच नाशिकमध्येही अशोका समुहाला असे आगळेवेगळे प्रदर्शन भरविण्याची संधी मिळाली. हे प्रदर्शन नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून जिज्ञासू भावी पिढीचा या प्रदर्शनातून नक्कीच अवकाशाविषयीचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागेल, असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला.प्रदर्शनासाठी मोफत संस्था व गु्रपची नावनोंदणी केली जात आहे. तीन दिवसांमध्ये प्रत्येक नावनोंदणी केलेल्य शाळांच्या विद्यार्थ्यांना प्रदर्शन बघता येणार आहे. यासाठी ठराविक वेळ निश्चित करून देण्यात येत आहे. जेणेकरून गर्दी व गोंधळ टाळता येण्यास मदत होईल. मनपा व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांनीदेखील नोंदणी केली असल्याचे शुक्ला म्हणाले. प्रदर्शनाचा समारोप रविवारी (दि.६) सायंकाळी होणार आहे.वैज्ञानिकांशी खुला संवादशाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इस्त्रोच्या उपस्थित राहणाऱ्या पाच वैज्ञानिकांशी या प्रदर्शनाच्या निमित्ताने खुला संवाद साधता येणार आहे. अवकाश विज्ञान क्षेत्रात भवितव्य घडवू इच्छिणारे विद्यार्थी यावेळी मार्गदर्शन घेऊ शकतील. यासाठी प्रश्नोत्तरांचे सत्रदेखील ठेवण्यात आले आहे.२० उपकरणांचा समावेशप्रदर्शनात इस्त्रोच्या विविध २० उपकरणांचा समावेश राहणार असून यामध्ये आर्यभट्ट, भास्कर, अ‍ॅपल, स्त्रोससह विविध उपकरणांचा समावेश असणार आहे. साउंडिंग रॅकेट्स, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही, एम-के३ आदिंच्या उड्डाण व जोखमीचा परिचय, रिमोट सेन्सिंग रचनेचा परिचय यावेळी वैज्ञानिकांकडून करून दिला जाणार आहे.---

टॅग्स :isroइस्रोChandrayaan 2चांद्रयान-2Nashikनाशिक