शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

नाशिकचे ई-गव्हर्नन्स केंद्र देशात ठरेल आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 23:52 IST

नाशिक : वकिलांसह पक्षकारांचाही वेळ व श्रम वाचविण्यासाठी ई-कोर्ट प्रभावी ठरणार आहे. नाशिकचे ई-गव्हर्नन्स केंद्र देशभरात आदर्श ठरेल, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीचे अध्यक्ष न्यायमुर्ती डॉ. धनंजय चंद्रचुड यांनी व्यक्त केला. लॉकडाऊन काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने न्यायदान शक्य झाले. व्हर्च्युअल कोर्ट लॉकडाऊनमध्येही सुरू होते. त्यामुळेच महाराष्टÑासह देशभरात लाखो खटल्यांचा निपटारा होऊ शकला बार असोसिएशनच्या पाठिंब्याशिवाय न्यायप्रक्रि या यशस्वी होऊ शकत नाही, याची खात्री आहे, असेही ते म्हणाले.

ठळक मुद्देधनंजय चंद्रचुड । पहिल्या ई-कोर्टाचा आॅनलाइनद्वारे शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वकिलांसह पक्षकारांचाही वेळ व श्रम वाचविण्यासाठी ई-कोर्ट प्रभावी ठरणार आहे. नाशिकचे ई-गव्हर्नन्स केंद्र देशभरात आदर्श ठरेल, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीचे अध्यक्ष न्यायमुर्ती डॉ. धनंजय चंद्रचुड यांनी व्यक्त केला. लॉकडाऊन काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने न्यायदान शक्य झाले. व्हर्च्युअल कोर्ट लॉकडाऊनमध्येही सुरू होते. त्यामुळेच महाराष्टÑासह देशभरात लाखो खटल्यांचा निपटारा होऊ शकला बार असोसिएशनच्या पाठिंब्याशिवाय न्यायप्रक्रि या यशस्वी होऊ शकत नाही, याची खात्री आहे, असेही ते म्हणाले.भारतातील पहिले ई-गव्हर्नन्स केंद्र अर्थात ई-कोर्टचा शुभारंभ शनिवारी (दि. २५) डिजिटल पद्धतीने करण्यात आला. हा सोहळा नाशिक बार असोसिएशनमार्फत यू-ट्यूबवरून दाखविण्यत आला. यावेळी उद्घाटक म्हणून चंद्रचूड बोलत होते. अध्यक्षस्थानी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्ता होते. याप्रसंगी महाराष्टÑचे अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे आदींनी सहभाग घेतला.नाशिकला सुरू झालेले ई-गव्हर्नन्स सेंटर कोविडच्या काळात गरजेचे होते. या काळात न्यायप्रक्रि याही प्रभावित झाली. ई-फायलिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी लाभदायी ठरले. हे केंद्र नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास न्यायाधीश दीपंकर दत्ता यांनी यावेळी व्यक्त केला़ या केंद्राचा फायदा महाराष्टÑासह गोवा राज्यातील १ लाख ७५ हजार वकिलांना होणार असल्याचे अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी सांगितले. प्रास्ताविक नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी केले. आभार न्या़ नितीन जामदार यांनी मानले.नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात ई-गव्हर्नन्स केंद्र हा पथदर्शी प्रयोग राबविण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी होईल. येथे काही वर्षांमध्ये देशभरातील विविध राज्यांच्या जिल्हा सत्र न्यायालयात अशाप्रकारे केंद्र सुरू करण्यात येतील जेणेकरून जलद न्यायप्रक्रि येला बुस्ट मिळण्यास मदत होईल, असेही यावेळी न्यायमुर्ती डॉ. चंद्रचूड यांनी सांगितले. यामुळे देशभरातील प्रलंबित खटले लवकरात लवकर निकाली निघण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकCounty Championshipकौंटी चॅम्पियनशिप