शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंचे आझाद मैदानात आंदोलन सुरु, हजारो मराठा आंदोलक मुंबईत
2
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
3
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
4
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
5
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
6
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
7
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
8
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
9
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
10
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
11
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
12
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
13
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
14
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
15
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
16
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
17
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
18
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
19
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात

नाशिकचा देबजित राय राष्ट्रीय नेमबाजी संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 20:31 IST

नाशिकचा नेमबाज देबजित राय याने राष्ट्रीय संघात स्थान मिळवून देदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेत शिकतानाच नेमबाजीचा नियमित सराव करीत देबजितने हे यश संपादन केले असून विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेची तयारी करतानाही त्याने त्याचा सराव नियमित सुरू ठेवला होता..

ठळक मुद्देनाशिकचा देबजित राय राष्ट्रीय संघातनेमबाजी स्पर्धांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी

नाशिक : शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमधून विविध खेळांमध्ये राष्ट्रीय व आंतररराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडत असून याच शृंखलेत नाशिकचा नेमबाज देबजित राय याने राष्ट्रीय संघात स्थान मिळवून देदीप्यमान यश संपादन केल्याची माहिती अशोका ग्रूप आॅफ स्कूलचे सहसचीव श्रीकांत शुक्ल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक आस्था कटारीया, अमिताभ गर्ग, दिनेश सबनीस आदी उपस्थित होते.  अशोका स्कूलमधील दहावीतील विद्यार्थी देबाजीत रॉय याने भारतीय संघात स्थान पटकाविले आहे. शाळेत शिकत असताना त्याची शुटिंगची आवड लक्षात घेऊन शाळेतील प्रशिक्षक अभय कांबळे यांनी त्याला प्रोत्साहन दिले. त्यामुळे २०१५ मध्ये देबजीतने पहिल्यांदाच जिल्हापातळीवरील एअर रायफल स्पर्धा  जिंकत कांस्यपदक पटकाविले होते. त्यानंतर २०१६ साली झालेल्या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर पुणे येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत निवड झाली. यानंतरच्या जिल्ह्यापातळीवरच्या व राज्य पातळीवरच्या विविध स्पर्धांतून देबाजीतने सातत्याने सुवर्ण, रजत पदक मिळवित यश संपादन केले. केरळ येथे झालेल्या ६१ व्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्यांची भारतीय संघात प्रवेश केला आहे.  देबजितने  नवी दिल्ली येथे झालेल्या‘खेलो इंडिया खेलो’ स्पर्धेसह कोल्हापूर, दिल्ली, मुंबई, केरळ येथे पार पडलेल्या विविध स्पर्धातुन स्वत:ला सिद्ध करीत जानेवारी २०२० मध्ये केरळ येथे झालेल्या स्पर्धेत सहभागी होत केलेल्या कामिरीमुळे भारतीय संघातील युवा श्रेणीत त्याने स्थान मिळविले आहे. या संघाचे सराव शिबिर येत्या १ एप्रिल २०२० पासून नवी दिल्ली येथे सुरु होणार आहे. 

टॅग्स :ShootingगोळीबारNashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी