शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३०३ अंगणवाडी सेविका होणार सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 22:02 IST

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात कपात केल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३०३ अंगणवाडी सेविका आणि २८० मदतनीस हे पाच वर्ष अगोदर सेवानिवृत्त होणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभेत देण्यात आली. जिल्हा परिषद अतंर्गत असणाºया अंगणवाडी सेविकांचा सेवाकाळ कमी करण्यात आल्यामुळे त्यांना सेवानिवृत्त करण्यात येणार असल्याची माहिती बालकल्याण समिती सभापती अर्पणा खोसकर यांनी दिली.

ठळक मुद्देशासकीय आदेशाचा बसला फटका वयात कपात केल्यामुळे पाच वर्ष अगोदर सेवानिवृत्त

नाशिक : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात कपात केल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३०३ अंगणवाडी सेविका आणि २८० मदतनीस हे पाच वर्ष अगोदर सेवानिवृत्त होणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभेत देण्यात आली. जिल्हा परिषद अतंर्गत असणाºया अंगणवाडी सेविकांचा सेवाकाळ कमी करण्यात आल्यामुळे त्यांना सेवानिवृत्त करण्यात येणार असल्याची माहिती बालकल्याण समिती सभापती अर्पणा खोसकर यांनी दिली.महाराष्टÑ शासन आणि महिला व बालकल्याण विभागाला २३ फेब्रुवारी रोजी या संदर्भातील आदेश प्राप्त झाल्यानंतर या निर्णयानुसार १ एप्रिल २०१८ रोजी वयाची ६० वर्ष पूर्ण होणाºया अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांना सेवानिवृत्त करण्यात येणार आहे. त्यामध्ये ३०३ अंगणवाडी सेविका, २८० मदतनीस आणि १ मिनी अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे. याबाबतची कार्यवाही या विभागाकडून केली जात असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी सभागृहात दिली.अंगणवाडी कर्मचाºयांचा सेवानिवृत्ती काळ कमी करण्याचा आणि मानधनात काही प्रमाणात वाढ करण्याचा विषय अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. यासंदर्भात शासनाने नुकतेच आदेश काढून सेवानिवृत्तीच्या वयात कपात केली आहे. अंगणवाडी कर्मचाºयांच्या सेवानिवृत्तीचे वय पूर्वी ६५वर्ष इतके होते आता ते ६० वर्ष करण्यात आले आहे. या कर्मचाºयांना निव्वळ मानधन असल्याने त्यांना ६५ वर्ष सेवाकाळाची सवलत देण्यात आलेली होती. परंतु आता त्यांचे वय कमी करण्यात येऊन आता ६० वर्ष करण्यात आले आहे. अगोदर सवलत आणि पुन्हा सेवाकाळात कपात करण्यात आल्यामुळे अनेक अंगणवाडी सेविकांना फटका बसला आहे.यावेळी झालेल्या चर्चेनुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षात आदिवासी उपाययोजनांतर्गत आदिवासी भागातील ४ कोटी ३५ लक्ष रकमेच्या प्रति अंगणवाडी ६.६० लक्ष याप्रमाणे ६६ अंगणवाडी केंद्र इमारतींना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये त्र्यंबकेश्वरमधील दोन, सुरगाणा २२, इगतपुरी २६, कळवण ४, दिंडोरी १ तर नाशिकमधील ६ याप्रमाणे मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच महिला व बालकल्याण विभागाकडील सर्व योजनांचा निधी येत्या मार्च २०१८ अखेर खर्च करावा, निधी अखर्चिक ठेवू नये अशा सूचना सभापती खोसकर यांनी दिल्या.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद