शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचा ३० हजार घरकुलांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 20:28 IST

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेने आणखी मोठे आव्हान स्विकारले असून शासनाकडे आणखी ३० हजार घलकुलांचा प्रस्ताव पाठविला आहे. यासाठी ४५० कोटी रूपयांचा निधी लागणार असून २०२२ पर्यंतचे उदिष्ट २०१९ मध्येच पुर्ण करण्याचा दावा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी केला आहे.

ठळक मुद्दे४५० कोटींची मागणी : २०२२ चे उद्दिष्ट २०१९ मध्येच करणार पुर्ण योजनेत नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या क्र मांकावर

नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेने आणखी मोठे आव्हान स्विकारले असून शासनाकडे आणखी ३० हजार घलकुलांचा प्रस्ताव पाठविला आहे. यासाठी ४५० कोटी रूपयांचा निधी लागणार असून २०२२ पर्यंतचे उदिष्ट २०१९ मध्येच पुर्ण करण्याचा दावा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी केला आहे.नाशिक जिल्ह्याने घरकुल कामांमध्ये मोठी झेप घेतली असून चार महिन्यांपूर्वी घरकुल योजनेत देशात २२५ व्या क्रमांकावर असलेला नाशिक जिल्हा आता ४० व्या क्रमांकावर आला आहे. तर राज्यात पल्यिा क्रमांकावर आहे. जिल्ह्यात घरकुल बांधकामाची प्रगती पाहाता यापेक्षा अधिक घरकुलांची कामे होऊ शकतात याविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जिल्हा परिषदेने एकुण ३० हजार घरकुलांचे शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम सुरु असून या योजनेत नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या क्र मांकावर आहे. जिल्ह्यात घरकुल बांधकामाची प्रगती पाहता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी अतिरिक्त ३० हजार घरकुलांचे उदिष्ट जिल्ह्यास उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.नाशिक जिल्ह्याकरिता सन २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षासाठी प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेसाठी एकूण २९,०८२ घरकुलांचे उदिष्ट मिळाले आहे. त्यापैकी २०१६-१७, २०१७-१८ या वर्षातील२३६१० उद्दिष्टापैकी २०७८८ (८८ टक्के) घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्विरत २८२२ घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. सन २०१८-१९ मधील ५४४३ घरकुल कामांपैकी ९३ कामे पूर्ण झाली असून आॅगस्ट अखेर सर्व उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार डॉ. गिते यांनी केला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शितल सांगळे तसेच अन्य पदाधिकारी व सदस्यांनीही अनुकुलता दर्शविली असून त्यांच्या सहकार्याने सदरचे उदिष्ट येत्या तीन मिहन्यात पूर्ण करण्यासाठी काम करण्यात येणार असल्याचेही गिते यांनी सांगितले.घरकुल योजनेबाबत वेळोवेळी आढावा बैठका, व्हिडीओ कॉन्फरन्स घेण्यात येत आहे. गट विकास अधिकारी व ग्रामसेवकांच्या बैठकीत सर्वांनी अतिरिक्त उदिष्ट पूर्ण करण्याची तयारी दर्शविल्याने ३० हजार अतिरिक्त उदिष्टाची मागणी करण्यात आली आहे. यासाठी ४५० ोटी रु पयांचा निधी लागणार असून २०२२ पर्यंतचे उदिष्ट २०१९ मध्येच पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे अतिरिक्त मागणी केल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद