शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भवर यांना राष्ट्रपती पोलीस पदक, तर अधीक्षक उगले यांना पोलीस पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 22:14 IST

नाशिक पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळू प्रभाकर भवर यांना उल्लेखनीय कामगिरीबाबत ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव वसंतराव उगले यांच्यासह पोलीस आयुक्तालयातील तीन व राज्य गुप्तवार्ता विभाग नाशिक कार्यालयातील एकास प्रशंसनीय कामगिरीबाबत ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहे़

ठळक मुद्देपोलीस दलात उत्कृष्ट कर्तव्य

नाशिक : पोलीस दलात उत्कृष्ट कर्तव्य बजावणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचे ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि़१४) जाहीर करण्यात आले़ त्यामध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळू प्रभाकर भवर यांना उल्लेखनीय कामगिरीबाबत ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव वसंतराव उगले यांच्यासह पोलीस आयुक्तालयातील तीन व राज्य गुप्तवार्ता विभाग नाशिक कार्यालयातील एकास प्रशंसनीय कामगिरीबाबत ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहे़

पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी वा कर्मचा-यांना स्वातंत्र्यदिनी सर्वोच्च अशा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित केले जाते़ राज्यातील अशा अधिकारी, कर्मचा-यांच्या जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातील सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळू प्रभाकर भवर यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले़ १९७८ मध्ये पोलीस दलात भरती झालेल्या भवर यांची ४० वर्ष सेवा झाली आहे़ २००३ मध्ये त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, २००५ मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलीस पदक मिळाले आहे़ भवर यांना चाळीस वर्षातील सेवेमध्ये ५५६ बक्षिसे मिळाली आहेत़

तर पोलीस दलातील प्रशंसनीय कामगिरीबाबतचे ‘पोलीस पदक’ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव उगले, शहर पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण संपत अहिरे, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष नाना जाधव, परिमंडळ दोनचे चालक सहायक पोलीस उपनिरीक्षक आरिफ खान दौडखान पठाण तर राज्य गुप्तवार्ता विभागाच्या नाशिक कार्यालयातील नंदकुमार सुरेशप्रसाद मिसर यांना जाहीर झाले आहे़

 

‘राष्ट्रपती पोलीस पदक’

बाळू प्रभाकर भवर, सहायक पोलीस उपनिरीक्षक. 

‘पोलीस पदक’

पंजाबराव वसंतराव उगले, अधीक्षक,  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग 

‘पोलीस पदक’

अरुण संपत अहिरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक

‘पोलीस पदक’

सुभाष नाना जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक ​​​​​​​

 

‘पोलीस पदक’

आरिफ खान दौडखान पठाण​​​​​​​, सहायक पोलीस उपनिरीक्षक ​​​​​​​

 

‘पोलीस पदक’

नंदकुमार सुरेशप्रसाद मिसर, राज्य गुप्तवार्ता विभाग, नाशिक

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस