शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी एक्सप्रेस फिरली माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 14:35 IST

नाशिक : मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वेसेवा संपुर्णपणे ठप्प झाली असून त्याचा परिणाम नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवर ...

ठळक मुद्देतीन गाड्या रद्द : दुरांतो एक्सप्रेस इगतपुरीत अडकली

नाशिक: मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वेसेवा संपुर्णपणे ठप्प झाली असून त्याचा परिणाम नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवर देखील झाला आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे मुंबईकडे जाणारे प्रवासी नाशिकरोड आणि इगतपुरी स्थानकात अडकून पडले आहेत. दरम्यान, दुरांतो आणि मंगला एक्सप्रेस या गाड्या इगतपुरी स्थानकातच थांबविण्यात आल्या आहे तर पंचवटी एक्सप्रेसला इगतपुरीहून पुन्हा मनमाडला पाठविण्यात आले.सर्वदूर सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीला प्रचंड फटका बसला असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नाशिकहून मुंबईला जाणारी पंचवटी एक्स्प्रेस गाडी मनमाडून नियोजित वेळेत मुंबईकडे सोडण्यात आली मात्र पावसाचा जोर वाढल्याने इगतपुरीतून गाडीला पुन्हा मनमाडकडे पाठविण्यात आली. इगतपुरीत पोहचलेल्या दुरांतो आणि मंगला एक्सप्रेस या गाड्यांना पाच तास इगतपुरी स्थानकातच पुढे जाण्यासाठीची वाट पाहवी लागली मात्र या मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे या गाड्यांना इतगतुरीत थांबून ठेवण्यात आले आहे. नाशिक आणि मनमाडकरांसाठी महत्वाची असलेल्या पंचवटी एक्सप्रेसलाही इगतपुरीतून पुन्हा मनमाडकडे पाठविण्यात आले.विस्कळीत झालेल्या रेल्वे वाहतुकीमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले असून असंख्य प्रवासी हे गाड्यांमध्ये आणि रेल्वेस्थानकातच अडकून पडले आहेत. उत्तरेतून आलेल्या रेल्वे या इगतपुरीत थांबून ठेवण्यात आल्याने प्रवाशांना संपुर्ण दिवस गाडीतच काढावा लागला. राज्यराणी, सेवाग्राम तसेच गोदावरी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस