शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

आरोग्य विद्यापीठाकडून आॅनलाइन शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 17:46 IST

नाशिक : कोरोनामुळे अनेक शिक्षणसंस्था बंद असल्यातरी या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काय व्यवस्था करण्यात आली आहे. याचा आढावा राज्यपाल ...

नाशिक : कोरोनामुळे अनेक शिक्षणसंस्था बंद असल्यातरी या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काय व्यवस्था करण्यात आली आहे. याचा आढावा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेतला. यावेळी आरोग्य विद्यापीठाकडून आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आॅनलाइन शिक्षणप्रणालीचा वापर करण्यात येत असलयची माहिती यावेळी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी कुलगुरूंना दिली.राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंची आॅनलाइन बैठक राज्यपालांनी घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विद्यापीठांच्या कार्यप्रणालीची माहिती जाणून घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाबाबत काय नियोजन करण्यात आले याविषयी आढावा घेतला. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाच्या नियोजनाची माहिती दिली. लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आरोग्य विद्यापीठाकडून विविध उपायोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आॅनलाइन अभ्यासक्रमाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.आरोग्य क्षेत्रातील सर्व महाविद्यालय व संस्थांनी शैक्षणिक क्षेत्रात इन्फोर्मेशन, कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजीचा प्रभावी वापर करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने आदेशित केलेले आहे. या अनुषंगाने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ७००पेक्षा अधिक रेकॉर्डडेड लेक्चर, पॉवर पॉइंट सादरीकरण अपलोड करण्यात आलेले आहे. विद्यापीठाने झूम या साफ्टवेअरच्या माध्यमातून ‘लाइव्ह लेक्चरर्सचीदेखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषयांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. याचा लाभ शिक्षकांनादेखील होणार आहे. विद्यार्थी इंटरनेटद्वारा संगणक, मोबाइल व टॅब्लेटवर लाइव्हल लेक्चर व संवाद साधता येणार आहे. विद्यापीठाने आॅनलाइन शिक्षणाकरिता ‘एमयूएचएस लर्निंग’ नावाने यू-ट्यूब चॅनेल सुरू केले असून, आजवर तीस हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकMediaमाध्यमेEducationशिक्षण