शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये रविवारी नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 15:47 IST

नाशिक : मोटर फेडरेशन स्पोर्ट्स  कौन्सिल आॅफ इंडियाच्या वतीने जानेवारीपासून सुरू झालेल्या नॅशनल मोटोक्रॉस सुपरक्रॉस चॅम्पियनशिपची पाचवी फेरी नाशिकमध्ये ...

ठळक मुद्देआॅस्ट्रेलियाच्या दोन रायडर्सचे फ्रीस्टाइल मोटोक्रॉस स्टंटचे प्रात्यक्षिकही बघण्याची संधी

नाशिक : मोटर फेडरेशन स्पोर्ट्स  कौन्सिल आॅफ इंडियाच्या वतीने जानेवारीपासून सुरू झालेल्या नॅशनल मोटोक्रॉस सुपरक्रॉस चॅम्पियनशिपची पाचवी फेरी नाशिकमध्ये रविवारी, दि. २५ रोजी सकाळी १० वाजता रंगणार आहे. पेठेनगर येथील मैदानावर होणाऱ्या मोटारबाइकचा थरार नाशिककरांना यावेळी अनुभवास मिळणार आहेच शिवाय आॅस्ट्रेलियाच्या दोन रायडर्स चे फ्रीस्टाइल मोटोक्रॉस स्टंटचे प्रात्यक्षिकही बघण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.स्पर्धेचे संयोजक श्याम कोठारी यांनी सांगितले की, कोचीन, गोवा, कोईम्बतूर, जयपूर येथे या स्पर्धेच्या चारफेऱ्या  पार पडल्या असून, नाशिकला पाचवी फेरी होणार आहे. शेवटची फेरी ही बडोदा येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी पेठेनगर (मुंबई-आग्रा मार्ग, इंदिरानगर) येथे जवळपास १२ जम्प, डबलजम्पचे ट्रॅक तयार करण्यात आले आहे. या स्पर्धा आठ गटांत खेळविण्यात येणार असून, यासाठी १२० रायडर्संनी प्रवेशिका पाठविल्या आहेत.नाशिकचे यश पवार, हर्षल कडभाने स्पर्धक सहभागी असणार आहे. ही स्पर्धा गॉडस्पीड रेसिंग पुणे यांनी नाशिक येथे आयोजित केली आहे . पेठे इस्टेट, पेठेनगर येथे विशेष डर्ट ट्रॅक बनवलेला असून, नाशिककरांसाठी ही एक मोठी पर्वणी असणार आहे . या स्पर्धेमध्ये विदेशी बनावटीच्या टू स्ट्रोक व फोर स्ट्रोक गाड्या बघण्याची संधीदेखील नाशिककरांना मिळणार आहे.एकूण विविध आठ गटांत ही स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये केरळचा सीडी जिनन आणि योनाक नोव्हा यांच्यात विजेतेपदासाठी चुरस बघायला मिळणार आहे. याशिवाय आॅस्ट्रेलियाचे फ्रीस्टाइल बाइक स्टंटबाज जॉर्डन स्पे्रग व शॉन वेब यांच्या करामती नाशिककरांना पाहण्याची संधी आहे. स्पर्धेला रविवारी, सकाळी १० वाजता सुरु वात होणार असून, आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. तर दुपारी २.३० वाजता पारितोषिक वितरण होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकmotercycleमोटारसायकल