शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 15:23 IST

नाशिक : जिल्ह्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे तर हवामान खात्याने ...

नाशिक: जिल्ह्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे तर हवामान खात्याने पुढील चोवीस तासात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तविली असल्यामुळे नाशिककरांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. गोदावरीत होत असलेल्या विसर्गामुळे गोदावरीने रौद्र रूप धारण केलेले असल्यामुळे नागरिकांनी पूर पाहाण्यासाठी पुलांवर तसेच नदीकाठी उभे राहू नये अशा सतर्कतेच्या सुचना देखील केल्या आहेत.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. यातच पावसाचा जोर कायम असल्यामुळे नदी धोक्याच्या पातळीपर्यंत वाहत आहे. क्षणाक्षणात पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव नागरिकांना सतकर्तचे आदेश देण्यात आले आहेत. नदीला आलेला पूर पाहाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पुलांवर पोलीस बंदबस्त तैनात करण्यात आला आहे. काही ठिकाणी बॅरिकेडस् टाकून वाहनांना पुलावरून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासात त्र्यंबकेश्वर, आंबोली या परिसरात तीनशे मिली.पेक्षा अधिक पाऊस सुरू आहे तर गंगापूर, काश्यपी, गौतमी या धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असल्यामुळे गोदावरी नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी वाढल्यामुळष सखल भागात राहाणाºया नागरिकांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. पूर पाहाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांना नागरिकांना हटविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. पावसाचा जोर पाहाता जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिककरांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुराचा आढावा घेण्यासाठी सकाळी सर्व अधिकाºयांची जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक बोलविली होती. यावेळी त्यांनी धरण क्षेत्रातील पाऊस आणि होणारा विसर्ग याची माहिती घेतली तसेच नदीकाठच्या रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती देखील घेतली. यावेळी त्यांनी अधिकाºयांना तत्पर मदतकार्य पोहचविण्याच्या सुचना दिल्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस