शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेतील रस्ता बंद झाल्याने व्यापाऱ्यांचा नगरपालिकेवर मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 17:46 IST

भगूर : पालिकेच्या वतीने भगूरमधील मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्याचे खोदकाम करण्यात आल्याने बाजारपेठेत येणाऱ्या -जाणाऱ्यांचा  मार्गच ठप्प झाल्याने संतप्त व्यापाऱ्यांनी  पालिका अधिकाऱ्यांना  घेराव घातला.भगूर नगरपालिकेच्या वतीने परिसरात कॉँक्रीटी रस्ते यापूर्वीच बनविले आहेत. या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठीची कामे सध्या भगूरमध्ये सुरू आहे. येथील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या मेनरोडमधील कॉँक्रिटीकरण पूर्णपणे उखडण्यात आले आहे. ...

ठळक मुद्देबाजारपेठेत येणाऱ्या -जाणाऱ्यांचा  मार्गच ठप्प रोजगारावर परिणाम जाणवत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे

भगूर : पालिकेच्या वतीने भगूरमधील मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्याचे खोदकाम करण्यात आल्याने बाजारपेठेत येणाऱ्या -जाणाऱ्यांचा  मार्गच ठप्प झाल्याने संतप्त व्यापाऱ्यांनी  पालिका अधिकाऱ्यांना  घेराव घातला.भगूर नगरपालिकेच्या वतीने परिसरात कॉँक्रीटी रस्ते यापूर्वीच बनविले आहेत. या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठीची कामे सध्या भगूरमध्ये सुरू आहे. येथील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या मेनरोडमधील कॉँक्रिटीकरण पूर्णपणे उखडण्यात आले आहे. सदर काँक्रीटीकरण  काढताना विश्वासात घेतले नसल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे. मेनरोडवरील कॉँक्रीट काढून टाकण्यात आल्यामुळे या मार्गावर चालणेही मुश्कील झाले आहे. व्यापारी आणि ग्राहकांनादेखील याचा त्रास सहन करावा लागत असून, त्याचा परिणाम व्यवसायांवर झाल्याचे व्यापाऱ्यांचे  म्हणणे आहे. रस्त्याचे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक करंजकर गल्ली मार्गे वळविण्यात आली आहे.एकीकडे लहवित रस्त्याचे काम सुरू असल्याने इगतपुरी परिसरातील नागरिक भगूरला न येता परस्पर देवळाली कॅम्पला जात आहेत. नानेगावला मिलिटरीकडून येण्या-जाण्यास मज्जाव केला जात आहे. विंचुरी दळवी परिसरातील नागरिकही शहरात न येता परस्पर रेल्वे गेटमधून देवळाली कॅम्पकडे जात आहेत. एकंदरीत भगूर शहराची बाजार पेठ संपूर्णपणे ठप्प होत असल्याने व्यापाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम जाणवत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी पालिकेवर धडक मोर्चा काढला. मुख्याधिकारी संगीता नांदुरकर या अनुपस्थित असल्याने मुख्य लिपिक रमेश राठोड यांना घेराव घालण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिकnagaradhyakshaनगराध्यक्ष