शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई नाका परिसरात एकाच रात्रीत चार दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 22:53 IST

नाशिक : मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील दोन मेडिकल, आईस्क्रीम व अ‍ॅटोमोबाईल अशी चार दुकाने एकात्र रात्री फोडल्याची घटना घडली आहे़ गोविंदनगर, सद्गुरूनगर आणि शिंगाडा तलाव परिसरातील ही दुकाने असून, यामुळे दुकानदार भयभीत झाले आहेत़ या परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे़

ठळक मुद्देचोरट्यांचा धुमाकूळ : दुकानदार भयभीत

नाशिक : मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील दोन मेडिकल, आईस्क्रीम व अ‍ॅटोमोबाईल अशी चार दुकाने एकात्र रात्री फोडल्याची घटना घडली आहे़ गोविंदनगर, सद्गुरूनगर आणि शिंगाडा तलाव परिसरातील ही दुकाने असून, यामुळे दुकानदार भयभीत झाले आहेत़ या परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे़

मुंबई नाका पोलीस ठाण्यात ऋषिकेश यादवराव गवळी (रा. श्रीसंत अपार्ट.सद्गुरुनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (दि़ २) मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचे श्री गणेश मेडिकल स्टोअर्स या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानाच्या गल्ल्यातील रोख रक्कम व कॉस्मेटिकच्या वस्तू चोरून नेल्या़ यानंतर चोरट्यांनी सद्गुरुनगरमधील आवारे हॉस्पिटल भागातील अमोल आईस्क्रीम आणि नंदिनी मेडिकल फोडून गल्ल्यातील रोकड व महागड्या वस्तू चोरून नेल्या.

शिंगाडा तलाव भागातील ओमकार गोविलकर यांच्या अ‍ॅटोमोबाइल दुकानाकडे चोरट्यांनी मोर्चा वळवित गल्ल्यातील रोकड चोरून नेली. एकाच रात्री झालेल्या या चार घरफोडींमध्ये १२ हजार ४०० रुपयांची रोकड व साहित्य चोरून नेले़ चोरीची रक्कम कमी असली तरी एकाच रात्री झालेल्या या घटनांमुळे दुकानदारांमध्ये घबराट पसरली आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस