शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 15:56 IST

नाशिक : कोल्हापूर आणि सांगली येथील भीषण पूरपरिस्थतीनंतर राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून, शहरातूनदेखील सुमारे तीस सेवाभावी संस्थाकडून ...

ठळक मुद्देएक हात मदतीचा : रविवारी अनेक भागांतून निघाल्या मदतफेऱ्या

नाशिक : कोल्हापूर आणि सांगली येथील भीषण पूरपरिस्थतीनंतर राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून, शहरातूनदेखील सुमारे तीस सेवाभावी संस्थाकडून मदतगोळा केली जात आहे. रविवारच्या सुटीचे औचित्य साधून शहरातील विविध भागांतून मदतफेरी काढण्यात आली. नाशिकरांनीदेखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सहकार्याचा हात पुढे केला आहे.शहरातील विविध सामाजिक संस्थांनी या कामी पुढाकार घेत शहरातून एकत्रित मदत कोल्हापूर, सांगलीसाठी जमा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या दोन्ही जिल्ह्यांवर कोसळलेल्या आस्मानी संकटानंतर येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, त्यांच्यासाठी रोजचा दिवस संकटे घेऊन येणारा ठरत आहे. दैनंदिन वापराच्या वस्तूंचादेखील तुटवडा निर्माण झाला असून, पूरग्रस्तांचे जनजीवनच ठप्प पडले आहे. येथील एकूणच परिस्थिती पाहता पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शहरातील सुमारे तीस संस्था मदतीसाठी सरसावल्या आहेत.पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आॅल इंडिया अ‍ॅण्टी करप्शन बोर्ड, सक्षम सोशल फाउंडेशन, इंडिया स्पोर्टस संघ, महिला विकास सामाजिक संस्था, मैत्र जीवाचे फाउंडेशन, राष्टÑीय सुरक्षा जागरण मंच, निसर्ग सेवक युवा मंच महाराष्टÑ राज्य, रुग्ण सेवा, कपिला बचाव समिती, नवनाथ पंथी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, फिनिक्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मद्रास युवा फाउंडेशन, साई राधा स्वामी फिल्म प्रॉड््क्शन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सायबर गुन्हे जागृती, गाडगेबाबा स्वच्छता अभियान, निसर्ग विज्ञान संस्था, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, ओम बजरंग सेवाभावी संस्था, सतीयुग फाउंडेशन, गोदावरी संवर्धन, वरुण नदी बचाव समिती, स्वयंभू ढोल-ताशा पथक आदींसह अनेक संस्था या कामी सरसावल्या आहेत.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊस