शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

धावपटू मोनिका ठरली दिल्ली मॅरेथॉन विजेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 18:49 IST

नाशिकची मॅरेथॉन गर्ल मोनिका आथरे हिने सलग दुसऱ्यांदा  दिल्ली मॅरेथॉन स्पर्धा जिंकून दिल्लीवरील दबदबा कायम ठेवला आहे. रविवारी (दि.२५) सकाळी दिल्लीत झालेल्या फुल मॅरेथॉन स्पर्धेत मोनिका आथरे हिने दोन तास ४३ मिनिटे आणि ४६ सेकंदाची वेळ नोंदवत मॅरेथॉनवरील विजयाची परंपरा कायम ठेवली आहे.

ठळक मुद्देदोन तास ४३ मिनिटे आणि ४६ सेकंदाची वेळ सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले

नाशिक : नाशिकची मॅरेथॉन गर्ल मोनिका आथरे हिने सलग दुसऱ्यांदा  दिल्ली मॅरेथॉन स्पर्धा जिंकून दिल्लीवरील दबदबा कायम ठेवला आहे. रविवारी (दि.२५) सकाळी दिल्लीत झालेल्या फुल मॅरेथॉन स्पर्धेत मोनिका आथरे हिने दोन तास ४३ मिनिटे आणि ४६ सेकंदाची वेळ नोंदवत मॅरेथॉनवरील विजयाची परंपरा कायम ठेवली आहे.नाशिक पोलीस मॅरेथॉन स्पर्धेत अर्ध मॅरेथॉन विजेती ठरलेली मोनिका हिने यावर्षी दिल्लीत पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करीत विजेतेपद मिळविले. मोनिका मागील वर्षीची दिल्ली मॅरेथॉन विजेती असून, तिने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले आहे. ४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन पूर्ण करताना तिने दोन तास ४३ मिनिटे आणि ४६ सेकंदांची वेळ नोंदविली, तर नेहमीच मोनिकाला टक्कर देणारी ज्योती गवते ही दुसºया क्रमांकावर राहिली. मोनिका राऊत हिला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले.यावर्षीची मोनिकाची ही पहिलीच मॅरेथॉन असून, तिने हंगामातील पहिल्या मोठ्या विजयाची नोंद केली आहे. तत्पूर्वी नाशिकमध्ये झालेल्या अर्ध मॅरेथॉनमध्ये तिने विजेतेपद मिळविले होते. १९ फेब्रुवारी रोजी मोनिका आथरे हिने मागीलर्षी सर्वच मॅरेथॉन स्पर्धांमध्ये बाजी मारली होती. मुंबई, ठाणे, वसई विरार, मुंबई, हैैदराबाद, बंगळुरू आणि दिल्ली हाफ मॅरेथॉनची ती विजेती असून, मॅरेथॉन गर्ल म्हणून तिच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यावर्षी मात्र ती मुंबईतील मॅरेथॉनमध्ये द्वितीय क्रमांकावर होती. पहिला क्रमांक तिचीच मैत्रीण आणि सोबत सराव करणारी संजीवनी जाधव प्रथम आली होती.नाशिकमधील पोलीस मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन मोनिका नुकतीच दिल्लीला स्पर्धेसाठी रवाना झाली होती. एका स्पर्धेनंतर मोठी विश्रांती न घेता तिने दिल्लीतील सर्वात मोठ्या स्पर्धेत सहभाग घेत विजयदेखील मिळविला. मोनिका ही नाशिकच्या भोसला हायस्कूलच्या मैदानावर तसेच क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकवर प्रशिक्षक वीजेंद्रसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिला महिंद्र अ‍ॅन्ड महिंंद्रने प्रायोजित केलेले आहे.

टॅग्स :NashikनाशिकSportsक्रीडा