शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 15:24 IST

नाशिक : देशात कोरोना महामारी असतानाही केंद्रातील भाजप सरकार बेफिकिरीने वागल्यामुळेच देशात कोरोनाचा उद्रेक झाला. केंद्र सरकार याबाबत कुठेही ...

ठळक मुद्देबाळासाहेब थोरात: भाजपा महाराष्ट्रद्वेषी असल्याचाही आरोप

नाशिक: देशात कोरोना महामारी असतानाही केंद्रातील भाजप सरकार बेफिकिरीने वागल्यामुळेच देशात कोरोनाचा उद्रेक झाला. केंद्र सरकार याबाबत कुठेही गंभीर दिसले नाही त्यामुळे कोरोनाचे संकट हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले असा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. गंगेच्या पात्रात शव वाहत असल्याचे पाप हे मोदी सरकारचेच असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.केंद्र सरकारला सात वर्ष झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसच्या वतीने रविवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. त्या अनुषंगाने नाशिकमध्येकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत थोरात यांनी मोदी सरकारवर चौफेर टीका केली. कोरोनाच्या संकट काळात केंद्र सरकार कुठेही गंभीर दिसले नाही त्यामुळे देशात कोरोनाची भयावह परिस्थिती निर्माण झाली असे थोरात म्हणाले. गेल्या सात वर्षाच्या काळात मोदी सरकारने अनेक आश्वासने दिली ती पूर्ण करण्यात आलेली नाही. पंधरा लाख रूपये खात्यावर जमा करू, परदेशातील काळा पैसा भारतात आणू या आश्वासनांचे काय झाले असा प्रश्नही थोरात यांनी उपस्थित केला.देशातील महागाईने जनता त्रस्त आहे. पेट्रोल शंभरीपार झाले आहे तर सिलिंडरचे भाव नऊशेपर्यंत पोहोचले आहेत. खाद्य तेलही २०० रूपयांवर पोहोचले आहे. मोदी सरकारच्या काळात महागाईने उच्चांक गाठला असल्याचे थोरात यांनी सांगितले. कामगार विरोधी कायद्यात कामगारांचा नाही तर मालकांचा विचार करण्यात आला आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलन दडपण्याचाही प्रयत्न केला गेला, असा आरोपही यावेळी त्यांनी केला. कोरोनाच्या संकटाची अगोदरच काळजी घ्यावी असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुचविले होते त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. थाळ्या-टाळ्या वाजविणे, दिवे लावणे हा उपाय नव्हताच असेही थोरात म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिकcongressकाँग्रेस