शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मुलांनो सावधान! तोतया वधू येत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 21:32 IST

नाशिक : मुलीला आई-वडील नाहीत, आम्ही मावशी-काकाच तिचे आईवडील, मुलीला पदरात घ्या, फार नाही दोन लाख द्या, लग्न साधेपद्धतीनेच करू, आमचे फार नातेवाईक नाहीत, असे म्हणून जर तुम्हाला मुलगी सांगून आली असेल तर सावधान!

ठळक मुद्देइगतपुरी तालुक्यातील दोन कुटुंबांची फसवणूकघोटी आणि देवळाली कॅम्प पोलिसांत याप्रकरणाची नोंद

नाशिक : मुलीला आई-वडील नाहीत, आम्ही मावशी-काकाच तिचे आईवडील, मुलीला पदरात घ्या, फार नाही दोन लाख द्या, लग्न साधेपद्धतीनेच करू, आमचे फार नातेवाईक नाहीत, असे म्हणून जर तुम्हाला मुलगी सांगून आली असेल तर सावधान!कारण हे स्थळ नसून तुम्हाला लुटण्यासाठी आलेली तोतया वधूची टोळी आहे.इगतपुरी तालुक्यातील गावांमध्ये दोन ठिकाणी अशाप्रकारे वरपक्षाची फसवणूक करून या टोळीने पोबारा केला आहे. घोटी आणि देवळाली कॅम्प पोलिसांत याप्रकरणाची नोंद होऊनही पोलिसांना तोतया वधूमंडळींचा शोध घेता आलेला नाही. विशेष म्हणजे या प्रकरणात मध्यस्थी करणारा मुलाच्या नातेवाइकांच्या हाती लागूनही तो कऱ्हाड मधून मोठ्या शिताफीने पळून गेल्याचे बोलले जात आहे. अर्थात पोलीस दफ्तरी याप्रकरणाची केवळ तक्रार दाखल असल्याने पोलीसही याप्रकरणाकडे फारसे गांभिर्याने पाहत नाहीत. परंतु जे काही घडले त्यावरून प्रकरण सोपे नक्कीच नाही.समाजातील काही घटकांमध्ये वधू मिळणे कठीण झाल्याने सांगून आलेली मुलगी म्हणजे सुवर्णसंधीच असते. त्यामुळे वधूपक्षाच्या सर्व अटी मान्य करून शिवाय रोख रक्कम देऊन मुलाकडील मंडळी लग्नासाठी तयार होतात. नेमका हाच धागा पकडून तोतया वधूमंडळींनी इगतपुरी तालुक्यात दोन गावांमध्ये महिनाभराच्या अंतराने दोन कुटुंबीयांना चुना लावला आहे.पहिली घटना तालुक्यातील एका गावात घडली. एका मध्यस्थामार्फत आलेल्या स्थळाने वरीलप्रमाणे कहाणी कथन करून एका कुटुंबात मुलीचे लग्न जमविले. मुलगी मिळाली म्हणून त्यांनीही मुलीकडील म्हणतील तसे करीत जवळच्याच एका मंदिरात लग्नही उरकले. लग्नात ठरल्याप्रमाणे मुलीच्या मावशीने दीड लाख रुपये दिले. रीतीरिवाजाप्रमाणे मोजक्याच वऱ्हाडीच्या उपस्थितीत लग्न पार पडले आणि मुलगी मुलाच्या घरीही आली. मुलीच्या मावशीने सांगितल्याप्रमाणे दुसºया दिवशी सर्वजण शिर्डीला दर्शनासाठी गेले. मावशीही शिर्डीत आली. दर्शन झाले, गप्पाटप्पा, जेवणखाण झाल्यानंतर मावशी आणि मुलगी काहीतरी वस्तू आणण्यासाठी दुकानात जातो असे म्हणून गेल्या त्या पुन्हा परतल्याच नाहीत. मुलाकडील मंडळींनी भ्रमणध्वनीवर त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर उलट पलीकडून शिव्यांची लाखोली वाहण्यात येऊन रॉँग नंबर असल्याचे उत्तर त्यांना मिळाले. दुसरी घटनाही जवळच्याच गावात घडली आणि त्यांचीही दोन लाखांची फसवणूक झाली आहे. हे दोन्ही कुटूंबे आता त्या तोतया वधुचा शोध घेत आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिक