शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात अडीच हजार बालके कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 22:12 IST

नाशिक : कुपोेषण मुक्तीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून पोषण आहार आणि आरोग्य सुविधांच्या अनेक योचना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जात असतानाही जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण सुमारे अडीच हजार इतके असल्याची धक्कादायम माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे तीव्र गंभीर कुपोषित बालकांची संख्या ६२९ इतकी असून मध्यम गंभीर कुपोषित बालकांची ...

ठळक मुद्देधक्कादायक : ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्याचे आदेश हरसूल, इगतपुरी, बागलाण, येवला या तालुक्यांमध्ये गंभीर

नाशिक : कुपोेषण मुक्तीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून पोषण आहार आणि आरोग्य सुविधांच्या अनेक योचना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जात असतानाही जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण सुमारे अडीच हजार इतके असल्याची धक्कादायम माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे तीव्र गंभीर कुपोषित बालकांची संख्या ६२९ इतकी असून मध्यम गंभीर कुपोषित बालकांची संख्या २०४२ इतकी आहे. या बालकांचे कुपोषण दूर करण्यासाठी जिल्ह्यात ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्याचे आदेश महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.जिल्ह्यातील कुपोषण रोखण्यासाठी पूरक पोषण आहार खरेदीबाबत गेल्या दोन वर्षांपासून दिरंगाई झाल्याने आणि अद्यापही मागणी नोंदविण्यात आली नसल्यामुळे जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे. सभापती अर्पणा खोसकर यांनी बोलविलेल्या सभेत या संदर्भातील आढावा घेतल्यानंतर कुपोषित बालकांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हरसूल, इगतपुरी, बागलाण, येवला या तालुक्यांमध्ये गंभीर कुपोषित बालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. बालकल्याण समिती सभेत आरोग्य विभागाचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळवे यांनी आरोग्यविषयक कामकाजाचा आढावा सादर केला. यावेळी त्यांनी कुपोषित बालकांची माहिती सांगितली. जिल्ह्यात फेब्रुवारी २०१८ अखेर मध्यम गंभीर कुपोषित बालके २०४२ व तीव्र गंभीर कुपोषित बालके ६२९ असल्याची माहिती दिली. शासनाकडून आरोग्यविषयक सुविधा व पूरक पोषण आहारासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करते. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे यावरून दिसून येते, असे खोसकर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याप्रकरणी गांभिर्याने कामकाज करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रकल्प स्तरावर लोकवर्गणी व लोकसहभागातून ग्रामविकास केंद्र सुरू करावेत, असे आदेश खोसकर यांनी यावेळी दिले. या केंद्रात बालकांना आणून त्यांच्यावर उपचार आणि आहाराची काळजी घेण्याच्या सूचना खोसकर यांनी दिल्या. नाशिक जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज असल्याचे खोसकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद