लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करता न आल्याने तसेच वाढत्या कर्जाला कंटाळून विषारी औषध सेवन करून एकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़७) अंबड लिंकरोड परिसरात घडली़ विजय पांडुरंग डांगे (रा. ओमसाई अपार्टमेंट, अंबड लिंकरोड, अंबड) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे़अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय डांगे याने व्याजाने कर्ज घेतले होते, मात्र कर्जाचे हप्ते थकल्याने तसेच दिवसेंदिवस कर्जाचा बोजा वाढला होता़ कर्जामुळे मानसिक स्थिती बिघडलेल्या डांगे यांनी रविवारी (दि़६) रात्री विषारी औषध सेवन केले़ सोमवारी (दि़७) सकाळी कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी अंबड पोलीस ठाण्यास माहिती दिली़ यानंतर अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी जाऊन डांगे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला़दरम्यान, मयत डांगे यांनी व्याजाने कोणाकडून व किती टक्क्याने पैसे घेतले याचा पोलीस तपास करीत असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
कर्जाला कंटाळून अंबडला एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 17:19 IST
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करता न आल्याने तसेच वाढत्या कर्जाला कंटाळून विषारी औषध सेवन करून एकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़७) अंबड लिंकरोड परिसरात घडली़ विजय पांडुरंग डांगे (रा. ओमसाई अपार्टमेंट, अंबड लिंकरोड, अंबड) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे़अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय डांगे याने ...
कर्जाला कंटाळून अंबडला एकाची आत्महत्या
ठळक मुद्देपरतफेड करता न आल्याने आत्महत्यादिवसेंदिवस कर्जाचा बोजा वाढला