शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

उसनवारीतून वडाळा-पाथर्डीत एकाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 17:23 IST

नाशिक : उसनवार घेतलेले साडेबारा लाख रुपये परत करीत नसल्याच्या कारणावरून मध्य प्रदेशातील दोघा संशयितांनी वडाळा - पाथर्डी रस्त्यावरून एकाचे अपहरण करून जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे़ प्रकरणी संशयित दीपक शांतीलाल जैन व सोनू नैन (रा. पिपल्या बुजुर्ग, ता. महेश्वर, जि. खरगोन, मध्य प्रदेश) यांच्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्दे१२ लाख ६० हजार रुपये देणे बाकी ; इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल

नाशिक : उसनवार घेतलेले साडेबारा लाख रुपये परत करीत नसल्याच्या कारणावरून मध्य प्रदेशातील दोघा संशयितांनी वडाळा - पाथर्डी रस्त्यावरून एकाचे अपहरण करून जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे़ प्रकरणी संशयित दीपक शांतीलाल जैन व सोनू नैन (रा. पिपल्या बुजुर्ग, ता. महेश्वर, जि. खरगोन, मध्य प्रदेश) यांच्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

इंदिरानगर पोलीस ठाण्यात रमेशसिंह डोंगरसिंह सोलंकी (३८, रा. शिवकृपा रो-बंगलो, फ्लॅट नं. १०७, समर्थनगर, पाथर्डीरोड, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काही महिन्यांपूर्वी संशयितांकडून लाखो रुपयांची रक्कम घेतली होती़ यापैकी काही रक्कम सोलंकी यांनी परत केली असली तरी १२ लाख ६० हजार रुपये देणे बाकी होते़

सहारा कंपनीत कामास असलेले सोलंकी यांची कंपनी बंद झाल्याने तसेच कंपनीचे संचालक सुब्रतो रॉय यांना अटक झाल्याने त्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले़ संशयित जैन यांनी उर्वरित रक्कम घेण्यासाठी गुरुवारी (दि़१०) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सोलंकी यांना वडाळा-पाथर्डी रोडवरील मेट्रो झोन मंदिरासमोर असलेल्या रामेश्वर मंदिर परिसरात बोलावून घेतले़

यानंतर संशयितांनी सोलंकी यांना शिवीगाळ व मारहाण करून बळजबरीने आपल्या कारमध्ये एमपी ०९ (पूर्ण नंबर माहीत नाही) बसवून अपहरण करून डांबून ठेवले. या दोघांच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर सोलंकी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत या संशयितांविरोधात फिर्याद दिली़

टॅग्स :NashikनाशिकKidnappingअपहरणPoliceपोलिस