नाशिक : रविवारचा सुटीचा दिवस असल्याने नाशिककरांनी साधुग्राममधील आखाड्यात साधू-महंतांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. काही आखाड्यांचे महंत दाखल झाल्याने त्यांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांचा ओघ तपोवनात वाढला होता. चतु:संप्रदाय आखाड्याचे महंत रामनाथदास महाराज अयोध्या व महंत भय्यादास महाराज उत्तर प्रदेश, महंत रामदास त्यागी महाराज हौशंगाबाद , मध्य प्रदेश, हिमालय बाबा यांचे आखाडे भाविकांनी फुलले होते. सुटी असल्याने महिला व बच्चे कंपनीने हजेरी लावली होती. तपोवनातील रस्त्यावर रहदारीला काही काळ अडथळा निर्माण झाला होता. पावसाने दुपारच्या वेळेला शिडकाव केल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. साधुग्रामधील आखाड्यांमध्ये अद्यापही बहुतांश कामे अपूर्ण आहेत. पत्र्यांचे शेड उभारण्याचे व पाण्याच्या टाक्या लावण्याचे काम सुरू आहे. तसेच आखाड्यांमध्ये पावसाचे पाणी साचू नये यासाठी वाळू, खडी टाकण्यात येत आहे.
नाशिककरांचा सुट्टीचा दिवस साधुग्राममध्ये
By admin | Updated: July 27, 2015 00:59 IST