शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत शिरला आगंतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 21:42 IST

नाशिक : पत्रकार असल्याचे सांगून सभागृहात शिरलेल्या एका मद्यपीने चक्क माईकचा ताबा घेण्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात घडला. या प्रकारामुळे अधिकारी, पदाधिकारी अवाक् झाले तर सुरक्षा यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. या मद्यपीला बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना मात्र चांगलीच कसरत करावी लागली.

ठळक मुद्देचक्क माईकचा ताबा : सुरक्षारक्षकांची उडाली धावपळपत्रकार असल्याची केली बतावणी

नाशिक : पत्रकार असल्याचे सांगून सभागृहात शिरलेल्या एका मद्यपीने चक्क माईकचा ताबा घेण्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात घडला. या प्रकारामुळे अधिकारी, पदाधिकारी अवाक् झाले तर सुरक्षा यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. या मद्यपीला बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना मात्र चांगलीच कसरत करावी लागली.बुधवार, दि. २१ रोजी जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा सुरू असतानाच सायंकाळच्या सुमारास एक मद्यपी सभागृहात अवतरला आणि त्याने सदस्यांच्या मागच्या बाकाचा ताबा घेतला. सभागृहाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कर्मचाऱ्याला त्याने आपण पत्रकार असल्याचे सांगून सभागृहात प्रवेश मिळविला. मात्र तोंडात गुटखा आणि मद्यप्राशन केलेला हा आगंतुक कोणी पत्रकार नसल्याची बाब चौकशीअंती लक्षात आल्यानंतर जिल्हा परिषद यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. या आगंतुकाचा आवेश पाहून कर्मचाऱ्यानी दोन हात दूर राहूनच त्याला सभागृहाबाहेर जाण्याचा इशारा केला, मात्र तोच येथील कर्मचाऱ्याना गप्प राहण्यास सांगत होता. ही बाब सदस्यांच्या लवकर लक्षात आली नाही. सदर बाब कर्मचाऱ्यांनी अध्यक्षांचे स्वीय सहायक खैरनार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी सदर बाब थेट व्यासपीठावरील मुख्य कार्यकारी अधिकारी गिते आणि अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या लक्षात आणून दिली.त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी पत्रकारांव्यतिरिक्त सभागृहात बाहेरील व्यक्तींनी बसू नये, अशी सूचना केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या  अंगरक्षक आणि  कर्मचाऱ्यांनी सदर मद्यपीस सभागृहाबाहेर काढले. बाहेर काढल्यानंतरही या पठ्ठ्याने दरवाजा ठोकून आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला. बाहेरील  कर्मचाऱ्यांशीही त्याने हुज्जत घातली. या दरम्यान, सभेचे कामकाज आटोपत असतानाच त्या मद्यपीने पुन्हा सभागृहात प्रवेश केला आणि सर्व पदाधिकारी, अधिकारी निघण्याच्या तयारीत असताना त्याने माईकचा ताबा घेत, अध्यक्ष महोदय असे म्हणत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हातातील माईक हिसकावून घेत त्याला पुन्हा सभागृहाबाहेर जाण्यास सांगण्यात आले.बाहेर आल्यानंतर त्यांने अनेक सदस्य आणि अधिकाऱ्या शी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त कर्मचाऱ्या नी त्यास विचारणा केली असता त्याने आपण एका आमदाराचा भाऊ असल्याचे सांगितले, तर अन्य एका कर्मचाऱ्या ला त्याने आपण पोलीस खात्यात असल्याचे सांगितले तर काहींना आपण पत्रकार असल्याची बतावणी केली. अखेर सभा संपल्यानंतर येथील कर्मचाऱ्यानी त्या मद्यपी माथेफिरूस जिल्हा परिषदेबाहेर घालवून दिले. तरीही तो तोतया बराच वेळ आवारात घुटमळतच होता.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद