शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातील वाढते कुपोेषण वेदनादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 19:19 IST

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने अक्षता लॉन्स येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यात उत्कृष्ट काम केलेल्या ५२ अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

ठळक मुद्दे५२ अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांचा गौरव कुपोषणमुक्त करण्यासाठी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन

शीतल सांगळे : अंगणवाडी सेविका, मदतनीस गौरव सोहळ्याप्रसंगी प्रतिपादननाशिक : औद्योगिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगतिपथावर असलेल्या नाशिक जिल्ह्यात कुपोषणाचे सर्वाधिक प्रमाण असणे ही वेदनादायक बाब असून, कुपोषणमुक्तीसाठी सर्व घटकांचे प्रयत्न लागणार आहेत. ज्या भागात कुपोषणाचे प्रमाण आहे तेथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याने त्यांनी ममत्वाने कुपोषणग्रस्त बालकांची सेवा केली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने अक्षता लॉन्स येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यात उत्कृष्ट काम केलेल्या ५२ अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे होत्या. व्यासपीठावर उपाध्यक्ष नयना गावित, शिक्षण व आरोग्य सभापती यतींद्र पाटील, अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे आदी उपस्थित होते.यावेळी सांगळे म्हणाल्या, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याच खऱ्या अर्थाने आदिवासी, खेड्यापाड्यात मोठ्या कष्टाचे काम करीत आहेत. नाशिक जिल्ह्याला कुपोषणाचा शाप लागल्याने यातून जिल्ह्याला मुक्त करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भूमिकाच महत्त्वाची ठरणार आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी म्हणून सूचना केल्या जातात; परंतु प्रत्यक्ष कुपोषणग्रस्तांबरोबर राहून त्यांच्या यातना जाणणाºया अंगणवाडी सेविका खºया अर्थाने आमच्यापेक्षाही मोठ्या ठरतात. शासन, पदाधिकारी या प्रश्नाच्या बाबतीत गंभीर आहेच; परंतु अंगणवाडी सेविकांच्या मदतीशिवाय हे काम पूर्ण होऊ शकणार नाही, असे सांगळे यावेळी म्हणाल्या.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी अंगणवाडी सेविका करत असलेल्या कामाचे कौतुक करून जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले.प्रास्ताविक महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष नयना गावित, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्र मास जिल्हा परिषद सदस्य सुनीता सानप, कविता धाकराव, नूतन अहेर, निफाड पंचायत समितीचे सभापती पंडित अहेर यांच्यासह बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते. डॉ. सुप्रिया खोटे यांचे यावेळी कुपोषण आणि किशोरवयीन मुलींच्या समस्यांवर व्याख्यान झाले.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद