शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांची पुन्हा ‘स्मार्ट’ कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:29 IST

अवघ्या एक किलोमीटरच्या स्मार्टरोडच्या बांधकाम पूर्ण करण्याची वाढवून दिलेली मुदत संपूर्णही स्मार्टरोडच्या बांधकामचे कवित्व सुरूच असून, गणेशोत्सवानंतर अंशत: सुरू करण्यात आलेला स्मार्टरोड सीबीएस चौकात  व मेहेर सिग्नल येथे रविवारी (दि.२२) पुन्हा अचानक बंद केल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना माघारी फिरावे लागले त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.

नाशिक : अवघ्या एक किलोमीटरच्या स्मार्टरोडच्या बांधकाम पूर्ण करण्याची वाढवून दिलेली मुदत संपूर्णही स्मार्टरोडच्या बांधकामचे कवित्व सुरूच असून, गणेशोत्सवानंतर अंशत: सुरू करण्यात आलेला स्मार्टरोड सीबीएस चौकात  व मेहेर सिग्नल येथे रविवारी (दि.२२) पुन्हा अचानक बंद केल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना माघारी फिरावे लागले त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. दोन्ही चौकांमध्ये स्मार्टरोडच्या कामासाठी रस्ता पुन्हा एकदाखोदण्यात येत असून, त्यामुळे या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीत अडसर निर्माण होऊ नये यासाठी मेहेर ते अशोकस्तंभ दरम्यानच मार्ग खुला करण्यात आला होता. त्यानंतर त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र रविवारी (दि.२२) अचानक हा सस्ता सीबीएस चौकात बंद क रून पुन्हा खोदण्यात आला. त्याचप्रमाणे मेहेर सिग्नल येथेही रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे शरणपूररोडने शिवाजीरोडच्या दिशेने जाणारी वाहने अडविण्यात आली असून, अशोकस्तंभाकडून त्र्यंबकनाक्याकडे जाणारा मार्ग, महात्मा गांधीरोडकडून सीबीएसकडे येणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.त्र्यंबकनाका ते अशोक स्तंभदरम्यानचा रस्ता सुरू असला तरी या मार्गावर समोरून येणाºया वाहनांमुळे अडसर निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होत आहे. स्मार्टरोडचे काम सुरू करण्यापूर्वी वाहतुकीचे कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याने या मार्गावरून जाणाºया वाहनधारकांना चौकात पोहोचल्यानंतर माघारी फिरावे लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. आता दोन्ही बाजंूचे रस्ते पूर्ण झाले असले तरी सीबीएस चौक व मेहेर चौकातील रस्ता पुन्हा एका खोदल्याने बंद केलेला स्मार्टरोड कधी सुरू होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.पायी चालणाऱ्यांनाही अडसरस्मार्टरोडचे काम करण्यासाठी ठेकेदाराने रस्ते बंद क रण्यासाठी दोरखंडांचा वापर केला आहे.या मार्गाने पायी चालणाºया नागरिकांना अडचणी येत आहे. डोक्यावर ओझे घेऊन जाणाºया नागरिकांना ओझे उतरवत ते हातात घेऊन चौक पार करावा लागत आहे. त्यामुळे मोठी कसरत करावी लागते.पदपथावरून काढला मार्ग४सीबीएस चौक व मेहेर सिग्नल परिसरात रस्ता खोदल्याने अनेक दुचाकीस्वारांनी स्मार्टरोडलगतच्या पदपथावरून मार्ग काढून रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला. मेहेर सिग्नलमार्गे अशोकस्तभांकडे जाणाºया वाहनांना मार्ग खुला आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबकनाकाते अशोकस्तंभ मार्ग खुला असल्याने महात्मा गांधी मार्गावरून येणारी वाहने याच मार्गाचा वापरकरून सीबीएसकडे येण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी निर्माण होतआहे, तर अगदी चौकात येऊन पोहोचलेली  दुचाकी वाहनचालकांनी या भागातील पदपथांचा वापर करून बाहेर पडण्याचा प्रयत्न  केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी