शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

मतदार यादीत आढळली ३३ हजार दुबार, मयत नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 19:05 IST

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने सुरू असलेल्या मतदार यादी पडताळणी मोहिमेत जिल्ह्यात सुमारे ३३ ...

ठळक मुद्दे निवडणूक शाखा : जिल्हाभर व्यापक शोधमोहीम

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने सुरू असलेल्या मतदार यादी पडताळणी मोहिमेत जिल्ह्यात सुमारे ३३ हजार नावे वगळण्यात आली आहेत. मयत तसेच दुबार मतदारांची ही नावे पडताळणीत समोर आल्यानंतर वगळण्यात आली. आणखी काही नावे सापडण्याची शक्यता असून, त्याबाबतची पडताळणीदेखील सुरू करण्यात आली आहे.लोकसभा निवडणूक-२०१९ नंतर लागलीच विधानसभा निवडणूक असल्याने जिल्हा निवडणूक शाखेने मतदार याद्यांच्या पडताळणीचे काम हाती घेतले आहे. निर्दोष आणि पारदर्शक मतदार यादी असावी, यासाठी बीएलओच्या माध्यमातून जिल्ह्यात व्यापकतेने सदर मोहीम राबविली जात आहे. लोकसभा निवडणूक-२०१९ मधील अनुभवानंतर निवडणूक शाखेकडून काळजी घेतली जात असून, विधानसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी म्हणून मतदार यादीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पडताळणीत सुमारे ३३ हजार २५७ इतकी नावे ही मयत आणि दुबार आढळून आली असून, आणखी काही नावे अतिरिक्त निघण्याची शक्यता आहे. मतदारांकडून मतदार यादीतील नावांसंदर्भात अपेक्षित आणि वेळोवेळी काळजी घेतली जात नसल्यामुळे दुबार आणि मयत मतदारांची नावे यादीत कायम राहतात. यंदा ही संख्या मोठी असल्याचे सुरू असलेल्या पडताळणीत आढळून आले आहे. निवडणूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार नांदगावमध्ये २४९४, मालेगाव (मध्य) मध्ये ३१८४, मालेगाव (बाह्य)२५२८, बागलाण ६६१, कळवण १४५०, चांदवड ४२२३, येवला २९२७, सिन्नर ५७३६, निफाड ११५४, दिंडोरी ५०५२, नाशिक पूर्व ११११, नाशिक मध्य ७०९, नाशिक पश्चिम ४३६, देवळाली २४५ आणि इगतपुरी मतदारसंघात १२४७ याप्रमाणे नाशिक जिल्ह्यात ३३,१५७ नावे दुबार आढळून आली आहेत.गेल्या काही महिन्यांपासून मतदार याद्यांच्या पडताळणीच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. या कामाबरोबरच मतदारयादी शुद्धीकरण व नोंदणी, मतदान केंद्रांचा आढावा, मनुष्यबळ व्यवस्थापन, दिव्यांग मतदार कल्याण यांसह मतदार जागृती तसेच संपूर्ण विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीबाबत कामे येत्या काही दिवसांत केली जाणार आहेत.

टॅग्स :NashikनाशिकVotingमतदान