शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या टप्प्यात ६८ टक्के अनुदान वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 20:44 IST

नाशिक : परतीच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दुसºया टप्प्यात प्राप्त ३९६ कोटी ६२ लाखांचा निधी ...

ठळक मुद्देअवकाळी : विलंबानंतर भरपाई देण्याला गती

नाशिक: परतीच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दुसºया टप्प्यात प्राप्त ३९६ कोटी ६२ लाखांचा निधी वितरणाचा कामाला गती आली असून एकुण ६८ टक्के रकमेची भरपाई वितरीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी नुकसानभरपाईचा दुसरा हप्ता मागील महिन्यात जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर सुमारे साडेपाच लाख शेतकºयांना भरपाई देण्यास प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यातील १८१ कोटींच्या भरपाईची रक्कम तालुकानिहाय नुकसानग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आल्यानंतर दुसºया टप्प्यातील भरपाई वाटपासही गती आलेली आहे.पहिल्याटप्प्यातील अनुदान वाटप करतांना आलेल्या अडचणींवर मात करून दुसºया टप्यातील अनुदान वाटप सुलभ होईल असे बोलले जात असतांनाच दुसºया टप्यातील अनुदान प्राप्त झाल्यानंतर एकाच बॅँकेच्या माध्यमातून अन्य बॅँकांमध्ये भरपार्ईचे धनादेश वर्ग करण्यासंदर्भात निर्णयास काहीसा विलंब झाला. मदतीची रक्कम तहसील कार्यालयांमार्फत न देता एकाच बॅँकेच्या माध्यमातून शेतकºयांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सबंधिंत बॅँकेला लाभार्थी शेतरकºयांच्या नावांची यादी सादर करणे, याद्या इंग्रजीत करणे, तालुकानिहाय याद्या तयार करणे या कामात यंत्रणा व्यस्त होती. दिलेल्या याद्यांमध्ये इंग्रजी स्पेलींगच्या चुका असल्यामुळे त्या दुरूस्तीसाठी देखील दोन चार दिवसांचा वेळ वाया गेला होता.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी