शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने धरणांच्या पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 18:56 IST

नाशिक : रविवारी दिवसभर झालेल्या पावसाने सायंकाळी विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी दुपारपासून नाशिकमध्ये पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या चोवीस ...

नाशिक : रविवारी दिवसभर झालेल्या पावसाने सायंकाळी विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी दुपारपासून नाशिकमध्ये पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ७२४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, या पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. शहर परिसरात पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे.गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, अवघ्या ९ टक्क्यांवर असलेल्या धरणातील पाणी आता ३३.८५ टक्के इतके झाले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सुरू असलेल्या पाणीकपातीचा फेरविचार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबरोबरच दारणा धरण ३८.४१, नांदूरमधमेश्वर ५४.५७, गौतमी-गोदावरी २१.२९, भावली ३९.१२, मुकणे १२ तर कडवा ७.८७ टक्के भरले आहे. दरम्यान, जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम असून, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या आठ दिवसांत इगतपुरीत ९६६ तर त्र्यंबकेश्वरमध्ये ४७४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी (दि. ८) सकाळपासून या ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे.दरम्यान, दोन दिवसांच्या पावसामुळे गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असली तरी मध्यरात्री पूर काहीसा ओसरला आहे. मात्र पुढील चार तासांत पावसाची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला असून, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने यात्रेकरू, भाविकांना अडकून पडावे लागले. तर इगतपुरीमध्ये गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस