शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणकर्त्या महिला कर्मचाऱ्यांची तब्येत खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:36 IST

आरोग्य विज्ञान विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी तीन महिला कर्मचाºयांची तब्येत खालावल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआरोग्य विद्यापीठ : जिल्हा रूग्णालयात दाखलआगामी काळात जनआंदोलन छेडण्याचा इशारा

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी तीन महिला कर्मचाºयांची तब्येत खालावल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अन्य चौघा कर्मचाºयांना देखील वैद्यकीय पथकाने दाखल करण्याचा सल्ला दिला आहे मात्र त्यांनी उपचारास नकार दिला आहे. दरम्यान, उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत असतांनाही प्रशासनाकडून उपोषणकर्त्यांशी कुणीही चर्चेला आले नसल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आरोग्य विज्ञान विद्यापीठात गेल्या आठ ते दहा वर्षांपासून रोजंदारी पद्धतीने काम करणाºया सुमारे ३५० कर्मचाºयांनी ‘समान काम आणि समान दाम’ या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून आरोग्य विज्ञान विद्यापीठासमोर काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सनदशीर मार्गाने आंदोलन करूनही आरोग्य विज्ञान विद्यापीठाने या कर्मचाºयांसंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. याउलट कामगार उपायुक्त आणि न्यायालायसमोर कर्मचारी हिताचा निर्णय घेण्याचे आश्वासन देऊनही विदयपीठ प्रशासनाने नंतर कोणताही शब्द पाळला नसल्याचा आरोप कंत्राटी कर्मचाऱ्यानी केला आहे.विद्यापीठ प्रशासन आणि मंत्रालयाकडून या संदर्भात अनेकदा आश्वासने देण्यात आली मात्र एकही आश्वासन शासनाने पाळले नसल्याने अखेर कर्मचाऱ्यानी १ मे  महाराष्ट्र  दिनानासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात केली आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी सुमारे दहा कर्मचाऱ्यांची तब्येत खालवल्याने प्रशासनाने त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राजक्ता वनीस, तृप्ती जाधव आणि ज्योती पेखळे असे रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्यांची नावे आहेत. अन्य काही कर्मचाऱ्यानी मात्र उपसारास नकार दिला आहे. यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अनेक संघटनांचा पाठींबा मिळत असल्याने आगामी काळात मोठा जनआंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठHealthआरोग्य