शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय अधिकाऱ्यांचे दौरे स्थगित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 17:03 IST

नाशिक : राज्यात कुठे ना कुठे आंदोलनाचा उद्रेक होत असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव अधिकाºयांच्या पुणे येथे होणाºया मिटिंग रद्द करण्यात आले असल्याचे समजते. गेल्या आठवड्यात पुण्यात मोठा उद्रेक झाल्यानंतर अनेक अधिकारी पुण्यात अडकले तर काही अधिकाºयांच्या वाहनांचे नुकसान झाल्याने अशाप्रकारची खबरदारी प्रत्येक कार्यालयांना घेण्याच्या सूचना करण्यात आल्याचे बोलले जाते.

ठळक मुद्देतणावाचा परिणाम : पुणे येथील अधिकाऱ्यांचे दौरे रद्द, बैठकादेखील लांबणीवर टाकण्यात आल्याची चर्चा

नाशिक : राज्यात कुठे ना कुठे आंदोलनाचा उद्रेक होत असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव अधिकाºयांच्या पुणे येथे होणाºया मिटिंग रद्द करण्यात आले असल्याचे समजते. गेल्या आठवड्यात पुण्यात मोठा उद्रेक झाल्यानंतर अनेक अधिकारी पुण्यात अडकले तर काही अधिकाºयांच्या वाहनांचे नुकसान झाल्याने अशाप्रकारची खबरदारी प्रत्येक कार्यालयांना घेण्याच्या सूचना करण्यात आल्याचे बोलले जाते.पुणे येथे अनेक विभागांच्या संचालकांचे कार्यालये आहेत. विभागीय आयुक्तालयांतील शासकीय कार्यालयांचे उपसंचालक कार्यालये उत्तर महाराष्टÑात आहे, तर या कार्यालयांची संचालक कार्यालये पुण्यात आहेत. अनेक विभागांचे मुख्य कार्यालयदेखील पुण्यामध्ये असल्याने पुणे येथे नियमित बैठका होत असतात. विशेषत: शासकीय कर्मचाºयांचे प्रशिक्षण तसेच कार्यशाळा यादेखील बार्टी पुणे येथेच होत असल्यामुळे शासकीय अधिकºयांच्या सातत्याने पुणे येथे दौरे होत असतात.मागील आठवड्यात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक शासकीय अधिकारी पुण्यातच अडकल्याने त्यांची गैरसोय झाली, तर राज्यातील काही जिल्ह्यांतील वर्ग १, वर्ग २ सारखे वरिष्ठ अधिकाºयांना रस्त्यातच थांबविण्यात आल्यामुळे त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. अर्थात कुणालाही त्रास अथवा इजा झाली नसली तरी रस्त्यातच त्यांना थांबावे लागले. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून पुणे येथील शासकीय अधिकाºयांचे दौरे स्थगित करण्यात आले असून, बैठकादेखील लांबणीवर टाकण्यात आल्याचे शासकीय वर्तुळात चर्चा आहे.

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकPune BRTपुणे बीआरटी