शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
5
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
6
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
7
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
8
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
9
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
10
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
11
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
12
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
13
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
14
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
15
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
16
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
17
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
18
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
19
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
20
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...

महाराष्ट्राच्या थोम्बासिंगने पटकावले सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 20:49 IST

पाचव्या युथ गटाच्या २३ वर्षांआतील मुलांच्या आणि मुलींच्या राष्ट्रीय  तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या वैयक्तिक फॉइल प्रकारात महाराष्ट्राचा  थोम्बासिंगने महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले.

ठळक मुद्देफेन्सिंग : पंजाब, केरळ, मणिपूरची चांगली कामिगरीया स्पर्धेतून भारतीय संघाची निवड करण्यात येणार

नाशिक : पाचव्या युथ गटाच्या २३ वर्षांआतील मुलांच्या आणि मुलींच्या राष्ट्रीय  तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या वैयक्तिक फॉइल प्रकारात महाराष्ट्राचा  थोम्बासिंगने महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले.महाराष्ट्र फेंसिंग असोसिएशन, नाशिक जिल्हा फेंसिंग असोसिएशन आणि कै. के.एन.डी. बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवटी येथील संत जनार्धन स्वामी आश्रमच्या हॉलमध्ये या स्पर्धा सुरू आहेत. थोम्बासिंगने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत पहिल्या सत्रात ११-७ अशी आघाडी मिळविली. दुसऱ्या सत्रातही त्याने असाच खेळ करत आपली आघाडी आणखी वाढवत ही अंतिम लढत २१-१४ अशी जिंकून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले.मुलीच्या सँबर या प्रकारात अंतिम सामना छत्तीसगडच्या सौम्या आणि पंजाबच्या हुसनप्रित यांच्यात खेळला गेला. यामध्ये पहिल्या सत्रात दोन्ही खेळाडूंनी जोमाने खेळ केल्यामुळे सौम्याला ८-७ अशी केवळ एका गुणांची आघाडी मिळवता आली. परंतु दुसऱ्या  सत्रात छत्तीसगडच्या सौम्याने प्रथमपासूनच आक्र मक खेळ करून सलग ३ गुण मिळविले. त्यानंतरही तिने हीच लय कायम राखत हा अंतिम सामना १८ विरुद्ध १२ अशा फरकाने जिंकून सुवर्णपदक पटकावले. मुलीच्या फाँईल या प्रकारात पंजाबच्या सरंजित कौर आणि केरळच्या एस. जी. आर्चा यांच्यात झालेला अंतिम सामना चांगलाच रंगला.पहिल्या सत्रात केरळच्या आर्चाने ५-३ अशी दोन गुणांची आघाडी मिळविली. दुसऱ्या  सत्रात मात्र पंजाबच्या सरंजित कौरने आपला पवित्रा बदलत अचानक हल्ला करण्याचे सूत्र अवलंबून दुसºया सत्रात ९-९ अशी बरोबरी प्रस्थापित केली. त्यानंतर तिसऱ्या  आणि निर्णायक सत्रातही सरंजित कौरने आणखी आक्र मक खेळ करत ही आघाडी वाढवत हा सामना १६-१३ असा जिंकून सुवर्णपदक पटकावले.या विविध प्रकारांत विजयी झालेल्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे शिवसेनेचे महानगरप्रमुख महेश बिडवे यांच्या हस्ते पदके देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे खजिनदार अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश काटोळे, या स्पर्धेचे तांत्रिक समितेचे प्रमुख ले. कर्नल विक्र म जामवाल उपस्थित होते.या स्पर्धेतून भारतीय संघाची निवड करण्यात येणार असून, निवड झालेले खेळाडू दि. १३ ते १८आॅक्टोबर दरम्यान मनिला, फिलिपिन्स येथे होणाºया आशियाची स्पर्धेत सहभागी होतील, अशी माहिती अशोक दुधारे यांनी दिली. शनिवारी सकाळी ११ वाजता या स्पर्धांचा समारोप होणार आहे.या स्पर्धाची संपूर्ण तांत्रिक जबाबदारी ले. कर्नल विक्र म जामवाल यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या विविध राज्यातून आलेले ३८ पंच पार पडत आहेत.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नितीन हिंगमिरे, राजू शिंदे, आनंद खरे, दीपक निकम, पांडुरंग गुरव, राजू जाधव आदी प्रतन्यशील आहेत.आजचा निकाल : मुले-वैयिक्तक स्पर्धामुले फाइल -१) एल. थोम्बासिंग (महाराष्ट्र ) - प्रथम, २) अर्जुन (पंजाब)- द्वितीय ३) बिबिष के. (तामिळनाडू ), आणि के. एच. मीताई ( एस.एस.बी.) दोघेही तृतीयईपी - १) पंजाब-प्रथम, २) पंजाब-द्वितीय ३) केरळ आणि एस.एस.सी.बी.तृतीय,मुली-वैयिक्तक स्पर्धाईपी -१)जयसरिता (पंजाब) - प्रथम, २) इना अरोरा (पंजाब)- द्वितीय एम. जे. ग्रिष्मा ( केरळ) आणि विद्यावती ( एस.एस.सी.बी.) दोघीही तृतीयफाँईल -१) सिम्रनजीत कौर (पंजाब)-प्रथम, २) एस. जी. आर्या (पंजाब)- द्वितीय ३) अनिता चानू(मणिपूर ), आणि एम. एचेईल( एस.एस.बी.) दोघीही तृतीय तर सँबर- प्रकारात सौम्या (छत्तीसगड), हुसेनप्रीत कौर(पंजाब) आणि के. अनिता( केरळ), हरप्रित कौर (पंजाब ) यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

टॅग्स :NashikनाशिकSportsक्रीडा