शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

 गंगापूर धरण ५५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 18:58 IST

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असताना गंगापूर धरण क्षेत्रात मात्र अपेक्षित पाऊस नसल्याने धरणाचा पाणीसाठा ...

ठळक मुद्देक्षेत्रात जोर कमी; जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असताना गंगापूर धरण क्षेत्रात मात्र अपेक्षित पाऊस नसल्याने धरणाचा पाणीसाठा अवघा एका टक्क्याने वाढला आहे. शनिवारी ५४.२८ टक्के असलेला साठा रविवारी ५५.७० टक्के इतकाच झाला आहे. दारणा धरणात शुक्रवारी असलेला ७०.९७ टक्के साठा रविवारी ७२ टक्के इतका झाला आहे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत नाशिक तालुक्यात रविवारी केवळ १५ मि.मी. पाऊस झाला. पावसाच्या या लहरीपणामुळे जिल्ह्यात सध्या विसंगत चित्र पहावयास मिळत आहे.आठ ते दहा दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केल्यामुळे जिल्ह्यातील नद्या-नाल्यांमधून पाणी वाहू लागले आहे, तर शेतकऱ्यांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाºया जिल्ह्यात उशिराने पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांना लागलेली चिंता परतलेल्या पावसाने काहीशी कमी झाली आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाण्याची पातळी ५५ टक्के इतकी झाली आहे, तर दारणा धरण ७२ टक्के इतके भरले आहे. नांदूरमधमेश्वरमधून २०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ करणाºया क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून अत्यल्प पाऊस असल्याने धरणातील पाणीपातळीत समाधानकारक वाढ होऊ शकलेली नाही. गेल्या ७ आणि ८ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे नाशिक शहरातील गुरुवारचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्यामुळे नाशिककरांना पुन्हा एकदा चिंता लागली होती. परंतु आता गेल्या शुक्रवारपासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाची हजेरी लागत असताना त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहरात समाधानकारक पाऊस झालेला नाही.रविवारी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार गंगापूर धरणात ५५, कश्यपीमध्ये ३५, गौतमीमध्ये ३८ तर आळंदी धरणात ३१ टक्के इतका पाणीसाठा आहे. दारणा धरणात ७२ टक्के, भावली ८२ टक्के, मुकणे २३ टक्के, वालदेवी ५७ टक्के, कडवा ५७ टक्के, नांदूरमधमेश्वर ९८ टक्के भरले आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस