शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

फडणवीस यांचे नाशिकात भर पावसात शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 19:11 IST

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा बुधवारी (दि.१८) अखेरच्या चरणात नाशिकमध्ये पोहोचली. यावेळीसुरू ...

ठळक मुद्देमहाजनादेश यात्रा : मनसे,राष्टÑवादीने सोडले काळे फुगे

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा बुधवारी (दि.१८) अखेरच्या चरणात नाशिकमध्ये पोहोचली. यावेळीसुरू झालेल्या जोरदार पावसातही रोड शो आणि बाइक रॅलीच्या माध्यमातून फडणवीस यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गुरुवारी (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या महाजनादेश यात्रेचा समारोप होणार असून, यावेळी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. दरम्यान, मनसे व राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी यात्रा मार्गावर काळे फुगे सोडून यात्रेला विरोध नोंदविला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा बुधवारी नाशिक येथे पोहोचली आहे. सायंकाळी शहरातील पाथर्डी फाटा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत झाल्यानंतर दुचाकी रॅली काढण्यात आली. सुमारे पाच हजार दुचाकीस्वार भाजपाचे झेंडे आणि ध्वज घेऊन रॅलीत सहभागी झाले आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर रॅलीत सहभागी झाले. सिडकोमार्गे मोटारसायकल रॅली गोल्फ क्लब येथे आल्यानंतर त्र्यंबक नाका येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सुरू झाला. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. अनेक ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. सिडको परिसरातील विजयनगर चौकात युवतींचे लेजीम पथक आणि मºहाठमोळ्या पोषाखात सहभागी झालेल्या अश्वारूढ युवतींच्या पथकाने स्वागत केले, तर हनुमान मंदिर चौकात आदिवासी पथकाच्या चमूने पारंपरिक पद्धतीने फडणवीस यांचे स्वागत केले.शहरातून निघालेली ही मिरवणूक पंचवटी कारंजा येथे जात असतांनाच जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ झाली पण रोड शो सुरूच ठेवण्यात आला होता. मनसे व राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी यात्रा मार्गावर हवेत काळे फुगे सोडून सदर यात्रेस विरोध दर्शविला.--इन्फो--तिघे जण ताब्यातमुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जीपीओ चौकात आली असता शिक्षणाच्या प्रश्नावर काही तरुणांनी मुख्यमंत्र्यांना फलक दाखविण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेप्रसंगी काही संघटनांनी विरोध करण्याची भूमिका घेतल्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेत शंभरपेक्षा अधिक कार्यकर्त्यांना नोटिसा बजविल्या होत्या, तर काहींना ताब्यातही घेण्यात आले होते. तरी काळे फुगे सोडले गेले.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारण