शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा  मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 14:05 IST

   नाशिक : महाराष्ट्र  आरोग्य विज्ञान विद्यापीठात गेल्या १० ते १२ वर्षांपासून स्थायी स्वरुपाचे काम करणाऱ्या  सुमारे ३०० कर्मचार्यांनी किमान वेतन मिळावे आणि कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन पुकारले असून या कामगारांच्या मागण्यांकडे विद्यापीठाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या ...

ठळक मुद्देकिमान वेतन मागणीसाठी कामबंद आंदोलनआंदोलनाचा ६३ वा दिवस, पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर घोषणाबाजी

   नाशिक : महाराष्ट्र  आरोग्य विज्ञान विद्यापीठात गेल्या १० ते १२ वर्षांपासून स्थायी स्वरुपाचे काम करणाऱ्या  सुमारे ३०० कर्मचार्यांनी किमान वेतन मिळावे आणि कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन पुकारले असून या कामगारांच्या मागण्यांकडे विद्यापीठाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालावर मोर्चा काढला.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचार्यांनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाला कामगार उपायुक्त तसेच कामगार न्यायालयात पुरेसे उत्तर देता आले नसतांना आणि कंत्राटी कर्मचारी विद्यापीठाचेच असल्याचे मान्य करूनही विद्यापीठाने अद्यापही कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय दिलेला नसल्याने आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. गेल्या ५ डिसेंबर २०१७ पासून कंत्राटी कर्मचारी समान काम, समान दाम, याप्रमुख मागणीसह निलंबीत कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घ्यावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना विद्यापीठ सेवेत सामावून घ्यावे अशा सात मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा ६३ वा दिवस आहे.या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी विद्यापीठ प्रशासन आणि पालकमंत्र्यांना भेटून आपली कैफीयत मांडलेली आहे. विद्यापीठाकडून नेहमीच आश्वासन देण्यात आले मात्र नंतर कोणीही कार्यवाही केलेली नाही. तर पालकमंत्री गिरीश महाजन यांना देखील तीन वेळेले भेट दिलेली आहे. मात्र त्यांनी देखील अद्याप सकारात्मक भूमिका घेतली नसल्याने गुरूवारी गोल्फ क्लब मैदान ते पालकमंत्री महाजन यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.सीटचे अध्यक्ष डॉ. डी.ए.ल कराड, रसचिटणीस सिताराम ठोंबरे, तानाजी जायभावे, अ‍ॅड. श्रीधर देशपांडे आदि नेत्यांसह कंत्राटी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. गोल्फ क्लब मैदान येथून सकाळी ११ वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. उंटवाडी रोडवरील पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालापर्यत मोर्चा काढण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. निलंबीत कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घ्यावे, समान काम, समान वेतन मिळावे, कर्मचाऱ्यांना पुर्वलक्षी प्रभावाने घरभाडे अदा करावे, किमान वेतन कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना सुट्यांचे नियोजन, २६ दिवसांचे वेतन, कामगारांना पेमेंटस्लिप, कायदेशीर पगारी रजा, व बोनस या कामगारांच्या प्रश्नांकडे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठHealthआरोग्य