शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक परिक्षेत्रात तंबाखूजन्य पदार्थबंदीच्या ‘कोटपा’ कायद्याची शून्य अंमलबजावणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:28 IST

नाशिक : महाराष्ट्रात प्रतिदिन ५२९ मुले सिगारेट वा तंबाखूजन्य पदार्थांचा वापर सुरू करतात़ यामध्ये महाविद्यालयीन मुले-मुलींचे प्रमाण सर्वाधिक असून ५० टक्के कर्करोग हा तोंडावाटे, तर ९० टक्के कर्करोगास तंबाखू कारणीभूत ठरते़ मात्र, दुर्दैवाने देशाचे भविष्य असलेल्या तरुणाईस व्यसनातून बाहेर काढण्यासाठी महत्त्वाचा अशा तंबाखूजन्य पदार्थबंदीसाठीच्या ‘कोटपा’ या कायद्याबाबत माहिती वा त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव आहे़

ठळक मुद्देनाशिक परिक्षेत्रात : पोलिसांच्या प्रशिक्षणानंतर विशेष मोहीम संबंध हेल्थ फाउंडेशन संस्थेतर्फे प्रशिक्षण

नाशिक : महाराष्ट्रात प्रतिदिन ५२९ मुले सिगारेट वा तंबाखूजन्य पदार्थांचा वापर सुरू करतात़ यामध्ये महाविद्यालयीन मुले-मुलींचे प्रमाण सर्वाधिक असून ५० टक्के कर्करोग हा तोंडावाटे, तर ९० टक्के कर्करोगास तंबाखू कारणीभूत ठरते़ मात्र, दुर्दैवाने देशाचे भविष्य असलेल्या तरुणाईस व्यसनातून बाहेर काढण्यासाठी महत्त्वाचा अशा तंबाखूजन्य पदार्थबंदीसाठीच्या ‘कोटपा’ या कायद्याबाबत माहिती वा त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव आहे़ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी संबंध हेल्थ फाउंडेशन संस्थेतर्फे नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधिका-यांना सोमवारी (दि़१२) प्रशिक्षण देण्यात आले़

विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाजवळील नूतन सभागृहात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते़ नाशिक परीक्षेत्रातील अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नाशिक ग्रामीण यातील तीस पोलिस निरीक्षकांना सिगारेट-तंबाखूजन्य पदार्थ सेवन बंदी कायदा (कोटपा)चे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे़ सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, तंबाखूच्या उत्पादनांची प्रत्यक्ष थेट / अप्रत्यक्ष जाहिराती, अल्पवयीन बालकांना तंबाखूजन्य उत्पादने विक्री, शाळांच्या १०० यार्ड परिसरात विक्री करणे हे कोटपा कायद्यानुसार प्रतिबंधित आहे़संबंध फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे पोलीस अधिका-यांना कोटपा कायद्याची सखोल माहिती मिळाली असून, याचा अंमलबजावणी करताना फायदा होणार आहे़ तसेच या कायद्यामुळे तरुणांना व्यसनापासून रोखता येणार आहे़पुस्तिकेचे प्रकाशन

पोलीस अधिका-यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात कोटपा कायद्याबाबत मराठीतून माहिती देणा-या एका विशेष पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले़ यामध्ये कायद्याची सखोल माहिती व त्यातील कलमांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे़ या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे केरळ व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी झाले आहे़९० टक्के कर्करोग तंबाखूमुळेजागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षण (जीएटीएस) २०१७ नुसार महाराष्ट्रातील २.५ कोटी लोक तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात़ तंबाखुचा वापर करणाºयांपैकी सुमारे ४५ हजार लोकांचा अकाली मृत्यू होतो़, तर महाराष्ट्रात प्रतिदिन ५२९ मुले तंबाखूच्या वापरास प्रारंभ करीत असल्याचे वास्तव आहे़ मात्र, कोटपा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी केल्यास यामध्ये घट येण्यास मदत होईल़ तोंडावाटे होणा-या कर्करोगाच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे उपचारांपेक्षा प्रतिबंध हा नेहेमीच चांगला असतो़- डॉ. गोविंद मंत्री, कर्करोगतज्ज्ञ तथा व्हॉइस आॅफ टोबॅको व्हिक्टिम मोहिमेचे अधिकारी

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस