शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील दिड हजार डॉक्टर्स संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 18:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : पश्चिम बंगालमधील डॉक्टरांवर झालेल्या हल्य्याच्या निषेधार्थ इंडियन मेडीकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी संपात नाशिक आयएमएचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क,नाशिक: पश्चिम बंगालमधील डॉक्टरांवर झालेल्या हल्य्याच्या निषेधार्थ इंडियन मेडीकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी संपात नाशिक आयएमएचे सुमारे दिड हजार डॉक्टर्स सहभागी झाले होते. अत्यावश्यक सेवा वगळून पुकारण्यात आलेल्या या संपामुळे रूग्णालयांमधील बाह्यरूग्ण विभागातील कामकाज ठप्प झाले होते. दरम्यान, डॉक्टरांवरील हल्ले रोखण्याचा कायदा करण्याबाबत आयएमए येथे झालेल्या चर्चेत डॉक्टरांनी अनेक प्रस्ताव सादर केले.पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या हल्याच्या घटनेचे देशभर पडसाद उमटले आहेत. डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासंदर्भात केंद्राने कायदा करावा अशी मागणी घेऊन आयएमएने देशभर संपाची हाक दिली आणि सर्वत्र संप सुरू झाला. या संपात नाशिक आयएमएने देखील सहभाग घेत सकाळी ६ वाजेपासून शहरातील आपत्कालीन सेवा सुरू ठेऊन संपाला सुरूवात करण्यात आली. या संपात शहरातील जवळपास ५०० रूग्णालांमधील आयएमएचे डॉक्टर्स सहभागी झाले होते. आयएएमला डेंटल आणि फिजिओ थेरपी डॉक्टरांनी देखील पाठींबा दर्शवित संपात सहभाग नोंदविला तर इतर पॅथींचा डॉक्टरानी, तसेच वैद्यकीय महाविदयलयांती डॉक्टर्स यांनी देखील पाठींबा दर्शविला अशी माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे यांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा