शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
4
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
5
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
6
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
9
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
10
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
11
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
12
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
13
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
14
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
15
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
16
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
17
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
20
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 

आता नाशिक जिल्हा परिषदेत ‘शिस्त परेड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 21:54 IST

महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी केलेल्या धडक कारवाईचा कित्ता आता मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनीही गिरविला असून, उशिरा कामावर येणाऱ्या ३७ कर्मचाऱ्याना त्यांनी नोटिसा बजविल्या आहेत.

ठळक मुद्दे३१ कर्मचाऱ्याना नोटिसा : लेटलतिफांना गिते यांचा दणकाइमारत आवारातील कक्षांचीही स्वच्छता करण्यात आली.

नाशिक : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी केलेल्या धडक कारवाईचा कित्ता आता मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनीही गिरविला असून, उशिरा कामावर येणाऱ्या ३७ कर्मचाऱ्याना त्यांनी नोटिसा बजविल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून विभागनिहाय अधिकाऱ्याच्या मॅरेथॉन बैठकांनंतर त्यांनी जिल्हा परिषदेची स्वच्छता आणि शिस्तीकडे लक्ष केंद्रित केले असून, गुरुवारी सकाळी त्यांनी ३७ कर्मचाऱ्याना नोटिसा काढल्या आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते हे दि. २० रोजी सायंकाळी जिल्हा परिषदेत दाखल झाले आणि आल्या आल्या त्यांनी खाते प्रमुखांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. रात्री ९ वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी अधिकाऱ्याची बैठक बोलावून कामकाजाविषयी अधिक माहिती जाणून घेतली, तर त्यांना कामकाजाच्या सूचनाही केल्या होत्या. विशेषत: ३० टक्के निधीची तरतूद करण्याबरोबरच कोणत्याही परिस्थितीत शासनाकडे निधी परत जाणार नाही, असे नियोजन करून तत्काळ मंजुरी, प्रशासकीय मान्यतेच्या प्रक्रिया करण्याच्या सूचना अधिकाऱ्याना केल्या होत्या. गतिमान प्रशासनासाठी त्यांनी अधिकाऱ्याशी संवादही साधला आहे.दोन दिवस अधिकाऱ्याशी चर्चा केल्यानंतर गिते यांनी गुरुवारी सकाळीच जिल्हा परिषद गाठली आणि सर्वच विभागांची पाहणी केली असता उशिरा कामावर आलेल्या सुमारे ३७ कर्मचाऱ्याना नोटीस बजाविली. यावेळी गिते यांनी परिसरातील स्वच्छतेची बारकाईने चौकशी करून स्वच्छतेला अधिक महत्त्व देण्याच्या सूचना करून संबंधित ठेकेदाराला समज देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. परिसरातील स्वच्छेतेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करून जिल्हा परिषेदेचे आवार तसेच इमारतीमधील साफसफाई करण्याचे आदेश दिले आहेत.गिते यांच्या आदेशानंतर जिल्हा परिषषदेत गुरुवारी स्वच्छतेबाबत काळजी घेण्यात आल्याचे चित्र होते. स्वच्छतागृहाची अनेकदा स्वच्छता करण्यात आली, तर आवारातील केरकचरा काढण्यात आला. इमारत आवारातील कक्षांचीही स्वच्छता करण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिकzpजिल्हा परिषद