शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

आसारामबापूंच्या भक्तांना रडू कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 22:59 IST

स्वयंघोषित अध्यात्म गुरू आसारामबापू यांना जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविल्याचे वृत्त कळताच त्यांच्या भक्तांना अश्रू अनावर झाले. येथील आश्रमात सकाळपासून हजारो भाविकांनी हवन आणि जप सुरू केला होता.

ठळक मुद्देआश्रमात  हवन : सकाळी ६ वाजेपासून भक्तांचा आश्रमात जपसकाळी ६ वाजेपासून भाविक आश्रमाकडे

नाशिक : स्वयंघोषित अध्यात्म गुरू आसारामबापू यांना जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविल्याचे वृत्त कळताच त्यांच्या भक्तांना अश्रू अनावर झाले. येथील आश्रमात सकाळपासून हजारो भाविकांनी हवन आणि जप सुरू केला होता. आसारामबापू यांना दिलासा मिळावा यासाठी भाविकांनी उपवास करीत ‘ओम नमो शिवाय:’ चा जप सुरू केला होता. दुपारनंतर बापूंच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर भाविकांचा आक्रोश अधिकच वाढला.अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयाने आसारामबापू यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जोधपूर कारागृहात विशेष न्यायालय स्थापन करण्यात येऊन आसारामबापू यांच्यासह अन्य तिघांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी बुधवारी सुनावणी होणार असल्यामुळे पहाटेपासून भाविकांनी येथील आश्रमात गर्दी गेली होती. सकाळपासून याठिकाणी भाविकांनी होमहवन आणि जपतप सुरू केले होते.न्यायालयाने बापूंना दोषी ठरविल्यानंतर भाविकांना अश्रू आवरणे कठिण झाले. तरीही यावर विश्वास न ठेवता अहमदाबाद येथील मुख्य आश्रमातून अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत कोणत्याही वृत्तावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आश्रमाच्या संचालकांकडून भाविकांना करण्यात येत होते. निकाल काहीही लागला तरी भाविकांनी संयम राखावा, कुणीही रस्त्यावर उतरू नये, असे आवाहन भाविकांना केले जात होते. परंतु भाविकांची मानसिकता लक्षात घेऊन पोलिसांना पाचारण करण्यात आले.सकाळी ६ वाजेपासून भाविक आश्रमाकडे येत होते. सकाळी सुरू झालेले पूजाविधी आणि धार्मिक कार्यक्रम दुपारपर्यंत अव्याहत सुरू होते. न्यायालयाच्या निर्णयाकडेदेखील सर्वांचे लक्ष होते. मात्र प्रसारमाध्यमांपेक्षाही अहमदाबाद येथील आश्रमाकडून येणाऱ्या निवेदनावरच विश्वास असल्याची भूमिका भाविकांनी घेतल्याने आश्रमाच्या निवेदनाकडे त्यांचे लक्ष होते. मात्र निकालाची माहिती मिळाल्यानंतर भाविकांना रडू कोसळले.दरम्यान, आश्रमात मात्र प्रसारमाध्यमांना परवानगी नाकारण्यात येऊन कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास मनाई करण्यात आली होती. भाविकांच्या भावना तीव्र असल्याने माध्यमांनी दूर राहण्याचा सल्ला आश्रमाच्या संचालकांकडून दिला जात होता.

 

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय