नाशिक : न्यायालयीन जामीनावर मुक्त असलेल्या सराईत गुन्हेगाराने एकावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना नाशिकरोड रेल्वेस्टेशनजवळील नालंदा हॉटेलजवळ रात्रीच्या सुमारास घडली आहे़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विभाकर प्रभाकर चंद्रमोरे (२८, रा. पवार डेअरीजवळ, ध्रुवनगर, शिवाजीनगर, सातपूर) या सराईत गुन्हेगाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़नाशिकरोड पोलीस ठाण्यात निलेश संजय दोंदे (३२, रा. गोरेवाडी, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फियार्दीनुसार, सोमवारी (दि़४) रात्री दहा वाजेच्या सुमारास हॉटेल नालंदासमोरील रिक्षामध्ये मित्र अमिर, रितेश व तयजुब खान यांच्यासमवेत गप्पा मारीत होते़ यावेळी सराईत गुन्हेगार व संशयित विभाकर चंद्रमोरे हा रिक्षा घेऊन आला व आरडा-ओरड करून लागला़ त्यामुळे दोंदे यांनी चंद्रमोरे यास तेथून जाण्यास सांगितले असता वाद घालून धक्काबुक्की करून निघून गेला़यानंतर सुमारे दहा -पंधरा मिनिटांनी संशयित चंद्रमोरे हा परत आला व बोल तुझे काय म्हणणे आहे असे म्हणून दोंदे यांच्या रिक्षामध्ये बसला़ यानंतर चंद्रमोरे याने आपल्या कमरेला लावलेले धारदार शस्त्र बाहेर काढून डोक्यात मारून गंभीर जखमी केले़या प्रकरणी दोंदे यांच्या फिर्यादीवरून संशयित चंद्रमोरे विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोडला सराईत गुन्हेगाराने केले एकावर वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 17:12 IST
नाशिक : न्यायालयीन जामीनावर मुक्त असलेल्या सराईत गुन्हेगाराने एकावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना नाशिकरोड रेल्वेस्टेशनजवळील नालंदा हॉटेलजवळ रात्रीच्या सुमारास घडली आहे़
नाशिकरोडला सराईत गुन्हेगाराने केले एकावर वार
ठळक मुद्देसराईत गुन्हेगार न्यायालयीन जामीनावर मुक्त नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल