शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कसारा रेल्वेमार्गावर दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 18:26 IST

नाशिक : मुसळधार पावसामुळे रस्ते मार्गावर दरड कोसळल्यानंतर दरड हटविण्याचे काम पूर्ण होत नाही तोवर कसारा घाटातील रेल्वे मार्गावरदेखील ...

नाशिक : मुसळधार पावसामुळे रस्ते मार्गावर दरड कोसळल्यानंतर दरड हटविण्याचे काम पूर्ण होत नाही तोवर कसारा घाटातील रेल्वे मार्गावरदेखील दरड कोसळल्यामुळे इगतपुरीहून मनमाडकडे निघालेल्या रेल्वे गाड्या या कसारा स्थानकात थांबविण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून दरड दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, पावसाचा जोर कायम असल्याने कामात व्यत्यय निर्माण होत आहे.जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची यंत्रणा कोलमडून पडलेली असतानाच दरड कोसळल्यामुळे सेवा पूर्ववत सुरू होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. मुंबईकडे निघालेली दुरांतो एक्स्प्रेस ही सुमारे पाच तासांपेक्षा अधिक काळ इगतपुरी स्थानकात थांबविण्यात आल्यानंतर दरड कोसळल्यामुळे या गाडीच्या परतीचा मार्गही बंद झाला आहे. त्यामुळे गाडीला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. सिंहगड एक्स्प्रेस कसारामार्गे वळविण्यात आलेली होती. परंतु दरड कोसळल्यामुळे सदर गाडी ही कसारा स्थानकातच थांबविण्यात आली आहे.दरम्यान, रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून दरड बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सायंकाळी उशिरापर्यत काम सुरू असल्याने या मार्गावरून गाड्या सुरू होण्यास आणखी तीन तासांचा विलंब होण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली आहे. दरम्यान, मुंबईकडे जाणाऱ्या आणखी तीन गाड्या मनमाडहूनच रद्द करण्यात आलेल्या आहेत. गाड्यांना विलंब होत असल्यामुळे प्रवाशांना स्थानकातच अडकून पडावे लागले आहे. तर दुरांतो आणि मंगला एक्स्प्रेसमधील प्रवासी गाडीतच अडकून पडले आहेत. दरम्यान, सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने दरड दूर करण्याच्या कामाला गती देण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे