शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

पडझड झालेल्या घरांची मिळेना भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 19:59 IST

नाशिक : गेल्या जुलै-आॅगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना आलेला पूर आणि पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तसेच ...

नाशिक : गेल्या जुलै-आॅगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना आलेला पूर आणि पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तसेच संसारोपयोगी साहित्यही वाहून गेले. या नुकसानीचे पंचनामे होऊन आता सहा महिन्यांचा कलावधी उलटूनही पडझड झालेल्या काही घरमालकांना अजूनही नुकसानभरपाई मिळू शकलेली नाही. त्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.यंदा धरणक्षेत्रात झालेला पाऊस आणि जिल्ह्यात सर्वदूर कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना मोठा पूर आला होता. या पुराचा सर्वाधिक फटका नाशिक शहरासह चांदोरी आणि सायखेडा या गावांना बसला तसेच बागलाण, पेठ, मालेगाव, निफाडमध्येही पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. पुराच्या पाण्यात काठांवरील घरे तसेच दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरांमधील आणि दुकानदारांचे साहित्य वाहून गेले आहे. शेतांमध्येदेखील काही फुटांपर्यंत पाण्याचे तळे साचल्यामुळे पिकांचेदेखील नुकसान झाले होते.या नुकसाचीने पंचनामे पूर्ण करण्यात येऊनही सर्वच नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही. पीक नुकसानीची भरपाई प्राधान्याने देण्यात आली. संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने त्यांनादेखील तातडीची दिली जाणारी मदत देण्यात आली आहे. मात्र पडझड झालेल्या घरांसाठीची मदत लांबणीवर पडली आहे. पंचनाम्यानंतर संबंधित घराला मान्यता आहे किंवा नाही याबरोबरच संबंधित घरमालकाला धोकादायक घर म्हणून नोटीस बजविण्यात आली होती का? या मुद्द्यावर नुकसानभरपाई रखडली आहे.पंचनामे आणि प्रांतांनी नुकसानीस पात्र ठरवूनही आता, मात्र अधिकृत अनधिकृतच्या मुद्द्यावर सुमारे ३५ लाखांची भरपाई अजूनही नुकसाग्रस्तांनी मिळू शकलेली नाही.पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या १६ पथकांनी अंशत: आणि पूर्णत: पडलेल्या ९६४ घरांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले होते. घरांच्या नुकसानीची भरपाई तातडीने देण्यात येणार असल्याचे यावेळी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. ग्रामीण आणि शहरी भागांतही अशा प्रकारचे पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पुरामुळे ज्यांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले त्यांच्या मदतीसाठी प्राप्त झालेल्या मदतीचे सुमारे ५१४ कोटींचे वाटप पूर्ण करण्यात आलेले आहे. मात्र ज्यांचे घरे वाहून गेली त्यातील अनेक बाधित अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरीriverनदी