शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या एका मिनिटाने हुकली संजीवनीची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 16:21 IST

एप्रिल महिन्यात आॅस्ट्रेलिया येथे होणाऱ्या  कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या वेळेची नोंद करू न शकल्याने संजीवनी जाधव हिचे कॉमनवेल्थचे तिकीट हुकले आहे.

ठळक मुद्देउपविजेतेपद : कॉमनवेल्थचे स्वप्न अधुरेचसंजीवनीमध्ये काहीसे नैराश्य; निकालाने धक्का

नाशिक : एप्रिल महिन्यात आॅस्ट्रेलिया येथे होणाऱ्या  कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या वेळेची नोंद करू न शकल्याने संजीवनी जाधव हिचे कॉमनवेल्थचे तिकीट हुकले आहे. पटीयाला येथील पात्रता फेरीत संजीवनीला अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी संजीवनीला विजेतेपदाचे दावेदार मानले जात होते. गेल्या वर्षभर अ‍ॅथेलेटिक्स आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करणारी संजीवनी आॅलिम्पिकचेदेखील आशास्थान मानली जात होती.  मात्र  कॉमनवेल्थचे स्वप्न भंगल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे.पटीयाला येथे सुरू असलेल्या फेडरेशन करंडक स्पर्धेतून कॉमनवेल्थसाठीची पात्रता स्पर्धा घेण्यात आली. या पात्रता फेरीतच संजीवनीला अवघ्या एक मिनिट काही सेंकंद अंतराने पराभवाला सामोरे जावे लागले. केरळच्या एल सूर्या हिने १० किलोमीटर स्पर्धेत ३२:२३.९६ वेळेची नोंद करीत प्रथम क्रमांक मिळविला शिवाय नवीन विक्रमही प्रस्थापित केला, तर संजीवनी जाधवने ३३:३६.४९ वेळेची नोंद करीत उपविजेतेपद मिळविले.कॉमनवेल्थसाठी पात्रता फेरीत प्रथम क्रमांक मिळविणे अपेक्षित असल्याने संजीवनीने कसून सराव केला होता. यासाठी तिने पहिल्या दिवशी झालेल्या पाच किलोमीटर स्पर्धेतून माघारीही घेतली होती. तिने १० किलोमीटर स्पर्धेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. परंतु स्पर्धेच्या अखेरच्या चरणात तिला एल सूर्या हिला मागे टाकता आले नाही आणि अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने संजीवनीचे स्वप्न अधुरे राहिले. पात्रतेसाठीची अपेक्षित वेळ तिला नोंदविता आली नाही. असे असले तरी जागतिक विद्यापीठ स्पर्धेत संजीवनी पूर्वीप्रमाणेच उज्ज्वल कामगिरी करून भारतासाठी पदके प्राप्त करेल, असा विश्वास तिचे प्रशिक्षण वीजेंद्रसिंग यांनी व्यक्त केला आहे.---कोट--धक्कादायक आणि निराशाजनककॉमनवेल्थचे स्वप्न घेऊन मैदानावर घाम गाळणाºया संजीवनीला पात्रता स्पर्धेत पदक मिळाले असले तरी पात्रता मिळविता न आल्यामुळे संजीवनीमध्ये काहीसे नैराश्य आले आहे. या निकालामुळे नक्कीच धक्का बसला आहे. फिजिकल फिटनेस पूर्णपणे असताना आणि कॉमलवेल्थची पात्रता पूर्ण करेल, असा सर्वांनाच विश्वास असताना पात्रता फेरी पार करता न आल्याचे दु:ख आहे. पहिली आलेली मुलगी हेदेखील चांगली खेळाडू आहे. ती एशियन चॅम्पियन असली तरी संजीवनीही तितकीच तयारीत होती. या निकालाने धक्का बसला आहे.- वीजेंद्रसिंग, प्रशिक्षक

टॅग्स :NashikनाशिकSportsक्रीडा