शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

सौभाग्य मधून उजळणार जिल्ह्यातील ५८ हजार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 18:28 IST

नाशिक: केंद्र सरकारच्या सहज बिजली  योजनेंतर्गत नाशिक परिमंडळात या योजनेचा आराखडा अंतिम टप्प्यात असून जिल्ह्यतील जवळपास ५८ हजार कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

ठळक मुद्देडिसेंबर-२०१८ अखेरपर्यंत योजनेचे लक्ष्य१६ हजार कोटी रूपयांची तरतूद

नाशिक: केंद्र सरकारच्या सहज बिजली  योजनेंतर्गत नाशिक परिमंडळात या योजनेचा आराखडा अंतिम टप्प्यात असून जिल्ह्यतील जवळपास ५८ हजार कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.ग्रामीण व शहरी भागातील एकही घर विना वीजजोडणी राहणार नाही, याची दक्षता सौभाग्य योजनेतून घेण्यात येणार आहे. डिसेंबर-२०१८ अखेरपर्यंत योजनेचे लक्ष्य साध्य करण्याचे उदिठ्ये ठेवण्यात आले आहे. या योजनेतून गोरगरिबांना (दारिद्रय रेषेखालील कुटुंब) मोफत वीज जोडणीसोबतच एक एलइडी बल्ब आणि एक पिनपॉर्इंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे. तर वीजजोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना (दारिद्रय रेषेवरील कुटुंब) अवघ्या ५०० रूपयांमध्ये वीजजोड मिळणार आहे. हे शुल्कही नियमित वीज बिलासोबत दहा सामान हप्त्यात भरावयाचे आहे. आतापर्यंत विद्युतीकरण न झालेल्या देशभरातील ४ कोटी ग्राहकांच्या घरापर्यंत वीज पोहचिवण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणली असून त्यासाठी १६ हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. अतिदुर्गम भागातील घरांचे विद्युतीकरण करण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग करण्यात येणार आहे. यातून रोजगारांच्या संधी वाढण्यासोबतच स्रियांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत मिळणार आहे.नाशिक परिमंडळात कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक सतीश करपे आणि मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता, सुनील पावडे यांच्या हस्ते नुकताच योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यांच्या हस्ते सुरगाणा तालुक्यातील आदिवासीबहुल हनुमंतमाळ व सुभाषनगर येथील विद्युतीकरणापासून वंचित असलेल्या कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आली. पहिल्यांदाच घरात वीज आल्याने लाभार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह व आनंद होता. यावेळी नाशिक ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे, उपकार्यकारी अभियंता अनंत झोले, सहाय्यक अभियंता एन. आर. भोर, व्ही. टी. वाझे यांच्यासह लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.नाशिक जिल्ह्यातील ५८ हजार कुटुंबियांना सौभाग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. यातील दारिद्र्य रेषेखालील २५ हजार कुटुंबियांना विनाशुल्क तर दारिद्रय रेषेच्या वरील ३३ हजार कुटुंबियांना नाममात्र शुल्क भरून वीजजोडणी मिळविता येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण