शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कुलरचा गारवा घेताना विजेपासून सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 15:43 IST

नाशिक : तप्त उन्हामुळे गारव्यासाठी मोठ्या प्रमाणात कुलरचा वापर केला जातो. परंतु अनेकदा कुलरचा वापर करताना त्यामध्ये विद्युत प्रवाह ...

ठळक मुद्देदक्षता : महावितरणकडून काळजी घेण्याचे आवाहन

नाशिक : तप्त उन्हामुळे गारव्यासाठी मोठ्या प्रमाणात कुलरचा वापर केला जातो. परंतु अनेकदा कुलरचा वापर करताना त्यामध्ये विद्युत प्रवाह उतरण्याची शक्यता असल्याने कुलरचा गारवा अनुभवताना सुरक्षिततेला अधिक प्राधान्य द्यावे आणि दक्षता बाळगावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.कुलर लावताना प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक दक्षता बाळगून, प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करून सुरक्षित राहणे गरजेचे आहे. अनेकवेळा अपघाताच्या घटनांमध्ये कुलरच्या जवळपास खेळणाऱ्या लहान मुलांचा समावेश असतो. त्यामुळे कुलरच्या सान्निध्यात लहान मुले येणार नाहीत, अशा पध्दतीने कुलरची मांडणी करावी, कुलरच्या पंख्यासमोर जाळी लावलेली असल्यास लहान मुलांचा हात पंख्यात जाणार नाही याचीदेखील काळजी घेतली पाहिजे.कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करणे अपेक्षित असते. मात्र अनेक लोक हे वीजप्रवाह सुरू असताना कुलरमध्ये पाणी भरतात. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. कुलरमधील वीजतारांचे (वायरचे) आवरण सुस्थितीत असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. कुलरमधून पाण्याची गळती होणार नाही याचीदेखील खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. वीज ग्राहकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून विद्युत अपघात टाळावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज