शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात एसटी ने दिली साडेचार कोटींची नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 16:30 IST

नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात गेल्या वर्षभर झालेल्या अपघातांमध्ये जखमींना तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईचा आकडा साडेचार कोटींच्यावर गेला आहे. महामंडळाला मागील वर्षीच्या तुलनते यंदा दुपटीने भरपाई द्यावी लागली आहे. अनेकविध मार्गांनी अपघात होत असले तरी त्याचा भुर्दंड महामंडळाला सोसावा लागत असल्याने चालकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी म्हणून ...

ठळक मुद्देमागील वर्षीच्या तुलनते यंदा दुपटीने भरपाई द्यावी लागली ४ कोटी ४७ लाख ५३ हजार ४५६ एवढी अपघात नुकसानभरपाई

नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात गेल्या वर्षभर झालेल्या अपघातांमध्ये जखमींना तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईचा आकडा साडेचार कोटींच्यावर गेला आहे. महामंडळाला मागील वर्षीच्या तुलनते यंदा दुपटीने भरपाई द्यावी लागली आहे. अनेकविध मार्गांनी अपघात होत असले तरी त्याचा भुर्दंड महामंडळाला सोसावा लागत असल्याने चालकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी म्हणून चालकांचे समुपदेशन आणि आरोग्य तपासणी करण्यावरही महामंडळाला खर्च करावा लागत आहे.अगोदरच आर्थिक तोट्यात असलेल्या महामंडळाला रोजच्या उत्पन्नाची चिंता असताना खर्चातील वाढही तोट्यात भर घालणारी ठरत आहे. नाशिक विभागातून अपघातग्रस्त प्रवाशांना एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ मध्ये २ कोटी ९४ लाख ८३ हजार ५६४ रुपये इतकी नुकसानभरपाई द्यावी लागली आहे. तर एप्रिल २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत ४ कोटी ४७ लाख ५३ हजार ४५६ एवढी अपघात नुकसानभरपाई अदा करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील अपघात भरपाई महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीला आणखी बिघडविणारी असल्याने अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या दृष्टीने महामंडळाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये त्यांचे समुपदेशन करणे तसेच त्यांना पुन्हा रिफ्रेशमेंट कोर्सला पाठविले जाते.वाहतूक नियमांचे पालन सर्वांचीच जबाबदारीसुरक्षित वाहन चालविणे ही चालकांची जबाबदारी आहे. आर्थिक तोट्यात असलेल्या महामंडळाला केवळ नुकसानभरपाईपोटी कोट्यावधी रुपये द्यावे लागतात. गेल्यावर्षी देण्यात आलेल्या नुकसानभरपाईचा आकडा पाहिला तर विभागाचे दोन दिवसाचे उत्पन्नही एवढे होत नाही. त्यापेक्षा जास्त नुकसानभरपाई द्यावी लागते. चालकांनी सुरक्षा तसेच वाहतूक नियमांचे पालन केले तर अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकेल. ही जबादारी केवळ एस.टी. चालकांची नाही तर इतर चालक आणि विशेषत: दुचाकीस्वारांनी नियमांचे पालन करून वेगावर नियंत्रण ठेवले तर अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकेल.- यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, नाशिक विभाग

टॅग्स :NashikनाशिकTravelप्रवास