शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

एशियन क्रॉसकंट्रीत संजीवनीला ब्रॉँझ पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 19:51 IST

चीन येथे झालेल्या १४व्या एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने ८ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत ब्रॉँझ पदक पटकावत भारताला पदक मिळवून दिले. चीन आणि जपानच्या धावपटूंना कडवे आव्हान देत संजीवनीने तिसरे स्थान मिळविले

ठळक मुद्देस्वाती गाढवे यांच्यापेक्षा उत्कृष्ट वेळेची नोंद भारतीय संघालादेखील कांस्य पदक मिळवून दिले.

आंतराष्ट्रीय  पदक : पूनम सोनुनेही सहाव्या क्रमांकावरनाशिक : चीन येथे झालेल्या १४व्या एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने ८ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत ब्रॉँझ पदक पटकावत भारताला पदक मिळवून दिले. चीन आणि जपानच्या धावपटूंना कडवे आव्हान देत संजीवनीने तिसरे स्थान मिळविले असून, आॅलिम्पिकपटू ललिता बाबर आणि एशियन स्पर्धेचा मोठा अनुभव असलेल्या स्वाती गाढवे यांच्यापेक्षा उत्कृष्ट वेळेची नोंद करीत संजीवनीने चीनमध्ये भारताचा झेंडा रोवला. संजीवनीच्या या कामगिरीमुळे भारतीय संघानेदेखील कांस्य पदक पटकाविले.चीन येथील आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी महिलांच्या भारतीय संघात चार महिलांची निवड करण्यात आली होती. संजीवनी जाधवसह जुम्मा खातून, ललिता बाबर आणि स्वाती गाढवे यांचा त्यात समावेश होता. महिलांच्या ८ किलोमीटरमध्ये संजीवनी जाधव हिने २८:१९ मिनिटांची वेळ नोंदवत करीत ब्रॉँझ पदक मिळविले. स्पर्धेत चीनची ली डेन हिने २८:०३ वेळेची नोंद करीत सुवर्ण तर जपानच्या अबे युकारी हिने २८:०६ मिनिटांची वेळ नोंदवून दुसरा क्रमांक मिळविला.कॉमनवेल्थ स्पर्धेत पात्रता मिळवू न शकल्याने काहीसे नैराश्य आलेले असतानाही त्यावर मात करीत संजीवनीने १४व्या एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना पदकाला गवसणी घातली. महिलांच्या आठ किलोमीटरमध्ये संजीवनीने वैयक्तिक ब्रॉँझ पदक तर भारतीय संघालादेखील कांस्य पदक मिळवून दिले. संजीवनीच्या या कामगिरीमुळे तिच्या कारकिर्दीत आणखी एका आंतराष्ट्रीय पदकाची भर पडली आहे.या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे रिओ आॅलिम्पिकचा अनुभव पाठीशी असणारी ललिता बाबर आणि पाच वेळेला एशियन स्पर्धेत सहभागी होण्याचा मोठा अनुभव असणाऱ्या स्वाती गाढवे यांच्यापेक्षा संजीवनीने चांगली कामगिरी केली. स्वाती अकराव्या स्थानावर राहिली तर ललिताला पंधराव्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्वातीला हीच स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ३०:१८ इतका वेळ लागला तर संजीवनीने तिच्यापेक्षा दोन मिनिटे आधी ही स्पर्धा पूर्ण केली. स्वातीला पाचवेळा एशियन स्पर्धेचा अनुभव असतानाही संजीवनीने केलेली कामगिरी कौतुकास्पद मानली जात आहे.गेल्या वर्षभर अ‍ॅथलेटिक्स आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळविणारी संजीवनी कॉमनवेल्थची तयारी करीत असताना तिला पात्रता मिळविण्यात यश आले नसतानाही तिने क्रॉसकंट्रीमध्ये पदक मिळवून आगामी जुलैमध्ये होणाऱ्या  एशियन चॅम्पियनसाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.

टॅग्स :NashikनाशिकSportsक्रीडा