शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या पंचवटी परिसरात पुन्हा बिबट्याचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 16:01 IST

पंचवटीतील मखमलाबाद शिवारातील गंगावाडी परिसरात गेल्या पंधरवाडयापासून बिबट्याचा उसाच्या शेतात व मळे परिसरात संचार असल्याने नागरीकांंमध्ये भितीचे वातावरण आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास काही शेतमजूरांना बिबट्याचे दर्शन घडल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देगुरूवारी सकाळच्या सुमारास काही शेतमजूरांना बिबट्याचे दर्शन शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना घडले बिबटयाचे दर्शन

नाशिक :पंचवटीतील मखमलाबाद शिवारातील गंगावाडी परिसरात गेल्या पंधरवाडयापासून बिबट्याचा उसाच्या शेतात व मळे परिसरात संचार असल्याने नागरीकांंमध्ये भितीचे वातावरण आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास काही शेतमजूरांना बिबट्याचे दर्शन घडल्याचे बोलले जात आहे.गंगावाडी परिसरात बिबट्याचा संचार असल्याची माहिती वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर वनविभागाच्या पथकाने परिसराची पाहणी केली. दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात यापूर्वीच एक पिंजरा लावण्यात आला असून आणखी एक पिंजरा लावण्याच येणार असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.गंगावाडी परिसरात सकाळच्या सुमाराला शेतात काम करत असतांना सखाराम थाळकर व पप्पू तिडके यांना बिबट्याचे दर्शन घडले. त्यांनी तत्काळ जवळ राहाणाºया पंडीत तिडके यांना याबाबत कळविले. तिडके यांनी वनविभागाला संपर्क साधला त्यानंतर वनविभागाचे वनपाल जी. एस. वाघ, उत्तम पाटील, आर. एम. सोनार, डी. पी. जगताप आदिंचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याचा शोध घेतला मात्र उसाचे शेत व दाट झाडी असल्याने पथकाला माघारी फिरावे लागले. परिसरात बिबट्याचा संचार असल्याने वनविभागाकडून गुरूवारी सायंकाळी तत्काळ पिंजरा लावण्याचे काम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.--इन्फो--लहान मुलांना एकटे न सोडण्याचे आवाहनमखमलाबाद शिवारातील गंगावाडीत असलेल्या गामणे व बागड मळयात बिबट्याचा मुक्तपणे संचार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. बिबट्याचा मुक्तपणे संचार असल्याने मळे परिसरात राहाणाºया नागरीकांनी सुरिक्षतता म्हणून लहान मुलांना शेतात एकटे सोडू नये. बिबट्या लहान मुलांवर सर्वप्रथम हल्ला करीत असल्याने मुलांकडे लक्ष देण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी