शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
6
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
7
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
8
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
9
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
10
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
11
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
12
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
13
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
14
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
15
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
16
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
17
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
18
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
20
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा

पाणीबचत आता नाशिककरांच्या हाती

By admin | Updated: November 4, 2015 23:57 IST

जलसंकट : काटकसर न केल्यास आणखी पाणीकपातीचे ढग

नाशिक : गंगापूर धरण समूहातून अखेर मराठवाड्यातील जायकवाडीसाठी एकूण १३५५ दलघफू पाणी सोडले जात असल्याने शिल्लक राहणाऱ्या ४६६६ दलघफू पाण्यापैकी नाशिक महापालिकेला जुलै २०१६ अखेर सुमारे ३४०० दलघफू पाणी पिण्यासाठी लागणार आहे. उर्वरित १२५० दलघफू पाण्याचा वापर औद्योगिक वसाहत, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र, मेरी आदिंसह सिंचनासाठी कसा आणि किती करायचा याचा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागणार आहे. मात्र, भविष्यातील जलसंकट लक्षात घेता पाणीबचत आता नाशिककरांच्याच हाती असून, काटकसर न केल्यास आणखी पाणीकपातीचे ढग दाटून येण्याची शक्यता आहे. गंगापूर धरण समूहातून अखेर जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या निर्णयावर अखेर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग उघड्या डोळ्यांनी पाहण्याचे दुर्भाग्य नाशिककरांवर आले. गंगापूर धरण समूहातून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर दि. ४ नोव्हेंबर अखेर धरण समूहातून १३५५ पैकी ९३ दलघफू पाणी सोडण्यात आले, तर अजून १२६२ दलघफू पाणी सोडले जाणार आहे. दि. ४ नोव्हेंबर अखेर गंगापूर धरण समूहात ५७२८ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातून जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर एकूण ४६६६ दलघफू पाणीसाठा शिल्लक राहणार आहे आणि हाच पाणीसाठा आता जिल्हा प्रशासनाला जुलै-आॅगस्ट २०१६ पर्यंत पुरवायचा आहे. महापालिकेने सन २०१५-१६ या वर्षासाठी जिल्हा प्रशासनाकडे ४६०० दलघफू इतक्या पाणी आरक्षणाची मागणी नोंदविलेली आहे. मनपाकडून गंगापूर धरणातून प्रतिदिन सुमारे ४१० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. म्हणजे प्रतिदिन १४.५० दलघफू इतके पाणी उचलले जाते. परंतु महापालिकेने धरणातील पाण्याचा अत्यल्प साठा लक्षात घेता ९ आॅक्टोबरपासूनच शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे.

पाणीकपात आता जुलैपर्यंत?

शहराची लोकसंख्या १८ लाखांहून अधिक असून, दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढतेच आहे. सद्यस्थितीत महापालिकेकडून गंगापूर धरणातून प्रतिदिन ४१0 ते ४२0 दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. सिंहस्थ कुंभमेळा काळात महापालिकेने प्रतिदिन ४६0 दशलक्ष लिटर पाणी उचलले होते. नाशिक महापालिकेला जुलै २0१६ अखेरपर्यंत सुमारे ३४00 दलघफू पाणी लागणार आहे. सदर पाणी जपून वापरण्यासाठी महापालिकेला सध्या सुरू करण्यात आलेली २0 टक्के पाणीकपात जुलैपर्यंत कायम ठेवणे भाग पडणार आहे. सन २0१६ मध्ये उन्हाळा कडक गेल्यास बाष्पीभवनाचाही पाणीसाठय़ावर परिणाम होऊ शकतो. शिवाय जून-जुलैमध्येही पावसाने पाठ फिरविल्यास जलसंकट गडद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने आणि सुयोग्य वापर करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. त्याचबरोबर महापालिकेलाही हॉटेल व्यावसायिक, सर्व्हिस स्टेशन, उद्यानांमधील पाणीपुरवठा यावर कठोर नियंत्रण आणावे लागणार आहे.