शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणाच्या पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 16:46 IST

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरसह परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. गुरुवारपर्यंत ...

ठळक मुद्देदमदार पाऊस : धरणात एका दिवसात २६६ दलघफू पाणीसाठा

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरसह परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. गुरुवारपर्यंत ५६ टक्के असलेला पाणीसाठा शुक्रवार दुपारपर्यंत ६१ टक्के इतका झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. गेल्या सात जुलै रोजी झालेल्या पावसानंतर धरणाच्या पातळीत वाढच झाली नसल्याने सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा होती. दरम्यान, नांदूरमधमेश्वरमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून धरणा धरण ८२ टक्के भरले आहे.हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. दाटून आलेले आभाळ, तर कधी ऊन, मधूनच डोकावणारा पाऊस अशा वातावरणामुळे नाशिककरांना पावसाची प्रतीक्षा होती. गेल्या तीन दिवसांपासून शहर, जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त केला जात आहे. गंगापूर धरणक्षेत्रात गेल्या चोवीस तासात तर पावसाची संततधार सुरू झाल्याने गंगापूर धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. इगतपुरीतही पावसाचे दरमदार आगमन झाले आहे. गेल्या चोवीस तासात इगतपुरीत १०१ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर पेठ तालुक्याने इगतपुरीलाही मागे टाकले असून, येथे १०९ मि.मी. पाऊस झाला आहे. त्र्यंबकेश्वरला ६१ टक्के पाऊस बरसलाशहर, जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ नक्कीच झाली आहे. गुरुवारपर्यंत ५६ टक्के असलेले गंगापूरधरण शुक्रवारी ६१ टक्के भरले होते, तर कश्यपी ३९, गौतमी ४१ आणि आळंदी धरणातील पाणीसाठा ५२ टक्के इतका झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण