शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दिंड्यांनी दुमदुमली नाशिकनगरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:36 AM

: श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी जिल्हाभरातील विविध गावांमधून आलेल्या दिंड्यांनी नाशिकनगरी दुमदुमून गेली. जय जय रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माउली एकनाथ नामदेव तुकाराम असा जयघोष करीत हजारो वारकरी आपापल्या दिंड्यांनी त्र्यंबकेश्वरकडे रवाना होत आहे. परंपरेनुसार निर्धारित स्थानी अनेक दिंड्यांनी दुपारी आणि रात्री विसावा घेतला.

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा येत्या सोमवारी (दि.२०) त्र्यंबकेश्वर येथे भरणार असून, त्यासाठी राज्यभरातून दिंड्या नाशिकमार्गे जात आहेत. शुक्रवारी (दि.१७) पालख्यांमधील संत-देवतांना रामकुंडावर गोदास्नान घालून मग दिंड्या मार्गस्थ झाल्या.नाशिक : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी जिल्हाभरातील विविध गावांमधून आलेल्या दिंड्यांनी नाशिकनगरी दुमदुमून गेली. जय जय रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माउली एकनाथ नामदेव तुकाराम असा जयघोष करीत हजारो वारकरी आपापल्या दिंड्यांनी त्र्यंबकेश्वरकडे रवाना होत आहे. परंपरेनुसार निर्धारित स्थानी अनेक दिंड्यांनी दुपारी आणि रात्री विसावा घेतला.संत निवृत्तिनाथ महाराज यात्रा यंदा सोमवारी (दि. २० जानेवारी) होणार असल्याने लांबच्या जिल्ह्यांतील दिंड्यांनी आगेकूच करण्यास प्रारंभ केला.त्यानंतर जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव, येवला अशा लांबच्या तालुक्यांमधील दिंड्यादेखील महानगराच्या विविध भागांमध्ये विसावल्या. त्र्यंबकेश्वरी भरणार असलेल्या या यात्रेसाठी त्र्यंबकेवर नगरपालिका तसेच निवृत्तिनाथ महाराज ट्रस्टच्या वतीनेदेखील विविध ठिकाणी वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.सोमवारी यात्रोत्सवपौष महिन्यातील षटतिला एकादशीला परंपरेप्रमाणे या यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात राज्यभरातून या वारीसाठी त्र्यंबकेश्वरला येत असतो. जिल्ह्यातील अनेक वारकरी तर सहकुटुंब या यात्रेत सहभागी होतात. नाशिक जिल्ह्यातील हा सर्वांत मोठा यात्रोत्सव असून, महाराष्टÑासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधील भाविकदेखील यात्रेत सहभागी होतात.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे