शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अंबड लिंकरोडवरील अवैध भंगार व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 23:00 IST

नाशिक : सातपूर-अंबड लिंक रोडवरील भंगार मार्केटमध्ये पोलिसांनी सोमवारी (दि़३०) कोम्बिंग आॅपरेशन केले़ यामध्ये विनापरवाना भंगार व्यवसाय करणाऱ्या आठ व्यापा-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

ठळक मुद्दे कोम्बिंग आॅपरेशन : भंगार माल जप्त

नाशिक : सातपूर-अंबड लिंक रोडवरील भंगार मार्केटमध्ये पोलिसांनी सोमवारी (दि़३०) कोम्बिंग आॅपरेशन केले़ यामध्ये विनापरवाना भंगार व्यवसाय करणाऱ्या आठ व्यापा-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

अंबड लिंकरोड परिसरातील बहुचर्चित भंगार मार्केट महापालिकेने उठविल्यानंतर व्यापा-यांनी परवाना घेऊन व्यवसाय सुरू केला आहे. या भागात पुन्हा भंगार खरेदी केले जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा होती. तसेच या भागात गुन्हेगारी वाढत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली अंबड पोलीस ठाणे, सातपूर पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची पाच ते सहा पथके तयार करण्यात आली होती़

संजीवनगर, अंबड लिंकरोड परिसरातील भंगार मार्केट परिसरात राबविण्यात आलेल्या कोम्बिंग आॅपरेशनमध्ये पोलिसांनी भंगार व्यावसायिकांचे परवाने तपासले़ तसेच खरेदी केलेल्या भंगार मालाच्या पावत्यांची तपासणी केली़ यावेळी परवाना नसलेल्या भंगार मालाचा व्यवसाय करणा-या आठ व्यापा-यांकडून सुमारे पाचशे किलो विनापावती खरेदी केलेले भंगार माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

दरम्यान, अंबड पोलीस ठाण्यात आठ भंगार व्यवसाय करणा-या व्यापा-यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी दिली़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस