शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मतेचा संदेश देणारी दौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 19:13 IST

नाशिक : सरदर वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच क्रीडाप्रेमी नाशिककरांनी एकात्मकतेचा संदेश देत शहरातून एकता ...

ठळक मुद्देएकता दिवस: जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग

नाशिक: सरदर वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच क्रीडाप्रेमी नाशिककरांनी एकात्मकतेचा संदेश देत शहरातून एकता रॅली काढण्यात आली. राष्टÑीय एकात्मकतेचा संदेश देण्याबरोबरच राष्टÑीय संकल्प दिवसाचे औचित्य साधून पहाटे या एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा प्रशासन, पोलीस आयुक्तालय तसेच जिल्हा क्रिडा अधिकारी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एकता दौड मध्ये असंख्य नाशिककर देखील सहभागी झाले होते. पोलीस परेड ग्राऊंड येथून एकता रॅली रॅलीला सुरूवात करण्यात आली. तत्पूर्वी देशभक्तीपरे गीते आणि पोलीस बॅँन्ड पथकाच्या धूनच्या माध्यमातून एकात्मकतेचा संदेश देण्यात आला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक पोलीस क्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक छोरींग दोरजे, पोलीस अधिक्षक आरती सिंग, जिल्हा क्रिडा अधिकारी रविंद्र नाईक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी उपस्थितांना एकतेची शपथ दिली. यावेळी पोलीस प्रशासनाकडून उपस्थित अधिकाऱ्यांना स्मृतिचन्ह देऊन गौरविण्यात आले.प्रारंभी करणसिंग यांनी वॉर्मसेशन घेतले. यावेळी सहभागी झालेल्या नाशिककरांनी गीतसंगीताच्या तालावर वॉर्मअप पुर्ण केले. सुमुखी अथनी आणि त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या गणेशवंदना सादर केली. ’साथ चले हम, साथ रहे हम, मंजील एक हमारी’ असा एकतेचा संदेश यावेळी नृत्याच्या माध्यमातून देण्यात आला. शहरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.पोलीस परेड ग्राउंड, पोलीस वसाहतमार्गे गंगापूररोड, गंगापूर नाका येथून कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड मार्गे पुन्हा पोलीस परेड मैदान येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासानकडून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. सुत्रसंचालन आरजे ऋषभ याने केले.

टॅग्स :Nashikनाशिकpolice parade groundपोलिस कवायत मैदानcollectorजिल्हाधिकारी